मुंबई

महाराष्ट्र सखीचा मंगलागौरीचा सोहळा उत्साहात

CD

‘महाराष्ट्र सखी’चा मंगळागौर सोहळा उत्साहात
मराठमोळ्या फॅशन शोसह पारंपरिक खेळांची रेलचेल
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) ः पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांच्या उत्साहात महाराष्ट्र सखी मंचतर्फे आयोजित मंगळागौरचा श्रावण सोहळा वाशीत रंगतदारपणे पार पडला. संस्थापक अध्यक्ष हेमलता गायकवाड आणि अध्यक्ष रंजना शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाने वातावरण सांस्कृतिक रंगाने भरून गेले. या कार्यक्रमाचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक होते.
कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री हेमांगी राव, अर्चना तेंडुलकर (चित्रपट निर्माती), अभिनेत्री वीणा जामकर तसेच क्रिएटिव्ह स्पार्क सेलिब्रिटी मॅनेजमेंटच्या अश्विनी शेंडगे यांची उपस्थिती लाभली. समाजसेविका नंदिनी विचारे, माजी माविमा अध्यक्ष ज्योती ठाकरे व माजी नगरसेविका विनया म्हात्रे यांसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. श्रावण सोहळ्यात पारंपरिक मंगळागौर खेळांसोबत महिलांसाठी मुक्त व्यासपीठ म्हणून मराठमोळा फॅशन शोही उत्साहात पार पडला. नवी मुंबईतील विविध मंगळागौर पथकांसह १५ हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. काही पथकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले, तर काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची झलक खेळांच्या माध्यमातून सादर केली. फॅशन शोमधील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या मराठमोळ्या वेशभूषेतून संस्कृतीचे वैभव उलगडले. विजेत्या पथकांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. उपस्थित महिलांनी सैराट चित्रपटातील गाण्यांवर ठेका धरीत संपूर्ण नाट्यगृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT