‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे, ता. १४ ः ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यव्यापी ‘सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धा’ २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली होती. या स्पर्धेत लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी राज्यभरातून शालेय विद्यार्थी, विशेष विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तसेच पालकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील खुली होती. शालेय विद्यार्थ्यांची (इयत्ता पहिली ते दहावी) निवडलेल्या स्पर्धा केंद्रावर प्रत्यक्ष (ऑफलाइन) झाली. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली. ऑनलाइन सहभागी स्पर्धकांनी चित्रकलेच्या वेबसाईटवर चित्रे अपलोड केली होती. यातील ऑफलाइन स्पर्धेतील राज्यपातळी आणि जिल्हा-केंद्र पातळीच्या विजेत्या स्पर्धकांचा निकाल यापूर्वी टप्प्याटप्प्याने आवृत्तीवार प्रसिद्ध केला आहे.
गट ई-राज्यपातळीवरील विजेते
प्रथम क्रमांक - सिद्धेश आनंदराव कुराडे, त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा, कोल्हापूर
द्वितीय क्रमांक - अनिकेत सोनाजी डुबे, मु. पो. पुरजळ, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली
तृतीय क्रमांक - सागर सौंदरजी झुंजारे, सूर्यनगर, झेंडा चौकाजवळ पावडेवाडी, जि. नांदेड
उत्तेजनार्थ - १) प्रीती हारुबेरा, कोट नाका, उरण, टेसाई ऑटोमोबाइल्ससमोर नवी मुंबई
२) नीरज राजाराम निकम, रमाबाईनगर-२, भांडुप (प.), मुंबई
मुंबई शहर परिसर
प्रथम क्रमांक - द्रोणा आकाशनंद हिरवे, मुलुंड, हिरानगर, मुलुंड (प.), मुंबई
द्वितीय क्रमांक - सानिका सदाशिव पाटील, काळेवाडी, ग. द. आंबेकर मार्ग, परेल, मुंबई
मुंबई उपनगर परिसर
प्रथम क्रमांक - नीरज राजाराम निकम, रमाबाईनगर-२, भांडुप (प.), मुंबई
द्वितीय क्रमांक - राज नरेंद्र सावंत, तीसगाव रोड, कोलसेवाडी, कल्याण (पूर्व), ठाणे
तृतीय क्रमांक - विशाल विनोद कदम, गोळीबार मैदान, जवाहरनगर, खार (पूर्व), मुंबई
ठाणे जिल्हा
प्रथम क्रमांक - वैष्णवी दत्ता जगडे, बेडेकर नगर, आगासॉन रोड, दिवा (ई), जि. ठाणे.
तृतीय क्रमांक - मानसी कुंदनतरे, रेती बंदर रोड, काल्हेर, भिवंडी, ठाणे.
उत्तेजनार्थ -१) अनिल नारायण सुतार, सिडको कॉलनी, सेक्टर २, ऐरोली, नवी मुंबई.
२) रोहित विकास पाटील, हिवली, पो. दुगड, भिवंडी-वाडा रोड, जि. ठाणे.
रायगड जिल्हा
प्रथम क्रमांक - प्रीती हारुबेरा, कोटनाका, उरण, नवी मुंबई.
द्वितीय क्रमांक - भक्ती गावडे, साईनगर पूर्व, उत्तेखोल, माणगाव, जि. रायगड.
तृतीय क्रमांक - वीणा मनोजकुमार नाईक, श्री राम नगर, लोजी, खोपोली, जि. रायगड.
उत्तेजनार्थ -१) समृद्धी सचिन वाणी, सेक्टर १०, नवीन पनवेल, जि. रायगड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.