‘कर-मित्र’ चॅटबॉटचे लोकार्पण
पनवेल महापालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पनवेल, ता.१६ (बातमीदार) ः स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजीराजे मैदानावर शुक्रवारी (ता. १५) पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
ध्वजारोहणानंतर वाहन विभागाच्या नवीन ड्रायव्हर केबीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. याचबरोबर महापालिकेच्या १० शाळांमध्येही स्वतंत्र ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आमदार विक्रांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, मंगला माळवे, स्वरूप खारगे, सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवयवदात्यांचा गौरव
अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत अवयव दानासाठी नोंदणी केलेल्या दात्यांना या सोहळ्यादरम्यान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून समाजात अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला.
कर-मित्र चॅटबॉटचे लोकार्पण
नागरिकांना अधिक सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने पनवेल महापालिकेने विकसित केलेल्या कर-मित्र चॅटबॉटचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. करसंबंधित माहिती आणि सेवा सहज मिळवण्यासाठी हा चॅटबॉट उपयुक्त ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.