मुंबई

पुढील चार दिवस दक्षतेचे!

CD

सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १६ : जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये शुक्रवारी (ता. १५) रात्रीपासून जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे दहीहंडी उत्सवावर काहीसे विरजण पडले असले तरी गोविंदा पथकांनी उत्स्फूर्तपणे हा उत्सव साजरा केला. रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे पालघर शहरासह ग्रामीण भागातील सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या. जोरदार पावसामुळे काही भागांत जनजीवन विस्कळित झाल्याचे पाहायला मिळाले, तर चाकरमान्यांची या पावसामुळे चांगलीच भंबेरी उडाली. रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे पालघर शहर जलमय झाले होते. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ६३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस म्हणजे २० ऑगस्टपर्यंत पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाने पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्टदरम्यान शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. समुद्रामध्ये ४५ ते ६५ किमी प्रतितासी वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने केले आहे.

जिल्ह्यात मान्सून सुरू होताच जूनमध्ये चांगला पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यामुळे जूनमध्येच धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाणीसाठा होऊ लागला. जिल्ह्यात जूनमध्ये ग्रामीण भागात चांगल्या व सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तलासरीमध्ये सर्वाधिक तर मोखाडा तालुक्यात सर्वात कमी पावसाची सरासरी नोंदवली गेली. वसई, वाडा, डहाणू, पालघर, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांत पावसाची सरासरी ५२० ते ६०० मिमीच्या जवळपास नोंद या महिन्यात झाली.

सरासरीपेक्षा २० टक्केच पाऊस
जून-जुलैमध्ये जिल्ह्यात सरासरी १,३१६ मिमी असते. त्या तुलनेत १,२११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्ये पालघर जिल्ह्याची सरासरी ३४५ मिमी असून, आतापर्यंत ७१ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. म्हणजे ऑगस्टमध्ये जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा २० टक्के पाऊस झाला आहे.

१ जून ते १६ ऑगस्टपर्यंत सरासरी पाऊस
तालुका तालुका सरासरी प्रत्यक्ष पाऊस
वसई १,९०५.२ १,१४३.४
वाडा १,८८३.३ १,३९२.८
डहाणू १,३८५.९ १,२६१.२
पालघर १,७१०.३ १,१६४.४
जव्हार १,९५९.९ १,६३६.७
मोखाडा १,५८५.२ १,३०४.३
तलासरी १,५५६.८ १,४२१.२
विक्रमगड १,८५९.५ १,३९३.३

महिन्यानुसार पावसाची आकडेवारी
महिना सरासरी प्रत्यक्ष पाऊस
जून ४११.९ ५७७.८
जुलै १,०६३.९ ८२८.७
ऑगस्ट (१६ पर्यंत) ७६६.३ ११५.९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT