मुंबई

पामबीच मार्गालगत अळंबी रानभाजी

CD

पाम बीच मार्गालगत अळंबीचे उत्‍पादन
श्रावणात दुर्मिळ भाजी उगवल्याने शहरवासीयांमध्ये आनंदोत्सव
जुईनगर, ता. १७ (बातमीदार) : श्रावणात शाकाहाराचे महत्त्व वाढते आणि या काळात रानभाज्यांची मेजवानी घेण्याची परंपरा आहे. शहरात रानभाज्या मिळणे अवघड असते; मात्र पाम बीच मार्गालगत आणि ज्वेल ऑफ नवी मुंबई पार्कच्या परिसरात ‘अळंबी’ (मशरूम) आढळून आल्याने फेरफटका मारणाऱ्या नागरिकांमध्ये विशेष आनंद दिसून येत आहे.
अळंबी ही बुरशीजन्य वनस्पती असून, कोकणात तिला भूछत्री किंवा अळंबी म्हणतात, तर इंग्रजीत मशरूम. ही भाजी प्रामुख्याने डोंगरमाथ्यावर, मुंग्यांच्या वारुळांजवळ किंवा रोवन असलेल्या भागात आढळते, मात्र तिचे तोडणे आणि सेवन करणे फार काळजीपूर्वक करावे लागते. कारण पूर्ण फुललेली अळंबी खाण्यायोग्य राहत नाही, तर झाडांवर दिसणारी मशरूम विषारी असू शकते. त्यामुळे ज्ञान असलेलाच व्यक्ती ती योग्य वेळी काढतो.
या भाजीची सरासरी किंमत ८०० ते १००० रुपये किलो इतकी असते. बाजारातही तिचे विविध प्रकार आढळतात. बटन मशरूम, ऑयस्टर मशरूम, गुच्ची मशरूम यांसह स्थानिक नावांनी ओळखले जाणारे प्रकार उपलब्ध असतात. अळंबी केवळ चविष्टच नव्हे तर पौष्टिकदृष्ट्याही समृद्ध आहे. त्यात प्रथिने, व्हिटॅमिन डी, सेलेनियम, बी समूह जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, हृदयविकार व मधुमेहाचा धोका कमी होतो. कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यासही ही भाजी उपयोगी ठरते.
...............
मंगळवार संकष्टीच्या दिवशी पाम बीच मार्गावर अळंबी आढळून आली. गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी ही भाजी दिसत आहे. रोज नागरिक तिची वाट पाहतात आणि ती खाण्यासाठी घेऊन जातात. निसर्गाने दिलेली ही दुर्मिळ भेट श्रावणातील जेवणाला खास चव आणि आरोग्यदायी स्पर्श देते.
-डी. डी. कोलते, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT