मुंबई

नवी मुंबईत ‘गोविंदा आला रे’चा गजर दुमदुमला

CD

नवी मुंबईत ‘गोविंदा आला रे’चा गजर दुमदुमला
वाशी, ता. १६ (बातमीदार) : ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात, पावसाच्या सरींनी अधिकच रंगत आणलेल्या वातावरणात शनिवारी (ता. १६) नवी मुंबईत दहीहंडी उत्सव जल्लोषात पार पडला. शहरातील चौक, गल्लीबोळ, सोसायट्या येथे लहानग्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद लुटला. कोरोनामुळे गेल्या काही वर्षांपासून उत्सवाची रंगत फिकी झाली होती; मात्र यंदा आगामी पालिका निवडणुकांमुळे राजकीय मंडळींनी पुन्हा मंडळांना पाठबळ दिल्याने शहरात दहीहंडी मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसले.
मुंबईकरांनीही यंदा नवी मुंबईतील दहीहंडी पाहण्यासाठी विशेष उत्साह दाखवला. सकाळपासूनच पावसाने दिलेली साथ आणि दुपारनंतर मुंबईतील नामांकित गोविंदा पथकांची नवी मुंबईत झालेली हजेरी यामुळे ठिकठिकाणी रंगत वाढली. गो गो गो गोविंदा, गोविंदा आला रे, झिंगाट, शांताबाई, ढगाला लागली कळ या मराठी-हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई अक्षरशः थिरकली. ढोल-ताशांच्या गजरात वातावरण अधिकच बेभान झाले. ऐरोली येथे शिवसेना (शिंदे गट) नेते विजय चौगुले यांच्या माध्यमातून सुनील चौगुले स्पोर्ट असोसिएशनच्या दहीहंडीला सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. येथे मराठी व हिंदी वाद्यवृंदासह सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. ऐरोलीतील साईनाथवाडीत तब्बल १५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची दहीहंडी लावण्यात आली होती. घणसोली सेक्टर नऊ, माथाडी भवन परिसर, तसेच विबग्योर शाळेसमोरील प्रांगण अशा अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आल्या. उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी शहरभर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तरीदेखील तरुणाईला दहीहंडीच्या जल्लोषात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवताना पाहिले गेले. अनेक ठिकाणी बॅनरबाजीमुळे चौकांचे विद्रूपीकरण झाल्याचे चित्र दिसले. पावसाची सर, ढोल-ताशे, गाणी, राजकीय रंगत आणि तरुणाईचा उत्साह या साऱ्यांमुळे यंदाची नवी मुंबईतील दहीहंडी अविस्मरणीय ठरली.
..........
टॅटूची क्रेझ
दहीहंडीमध्ये सहभागी तरुणाईने पारंपरिक पोशाखाबरोबर अंगावर विविधरंगी टॅटू काढून आपली स्टाइल दाखवली. काहींनी आई-वडिलांचे नाव, काहींनी देवतांचे चित्र, तर काहींनी केसांना रंग देऊन आकर्षक हेअरस्टाइल केली होती.
.............
वाहतुकीचे नियम धाब्यावर
गोविंदा पथके दुचाकींवरून हेल्मेटशिवाय फिरताना आढळली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली; मात्र पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कानाडोळा करण्यात आला.
............
चौकांना बॅनरचा विळखा
दहीहंडीनिमित्त चौकाचौकांत प्रचंड बॅनरबाजी झाली. काही बॅनर परवानगीने होते तर अनेक अनधिकृत. या बॅनरमुळे चौकांचे सौंदर्य बिघडल्याचे चित्र दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT