भक्तिरंग स्वरयात्रेतून ज्ञानेश्वर माउलींना स्वरांजली
वाशी (बातमीदार) ः गोकुळाष्टमी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महापालिकेतर्फे मुख्यालयातील अॅम्फिथिएटरमध्ये भक्तिरंग गानसंध्येचे आयोजन झाले. सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर व सहकलाकारांनी अभंग आणि भक्तिगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायिका श्रावणी वागळे, अमेय बाळ तसेच विविध वादकांच्या सहकार्याने वातावरण भक्तिरसात रंगले. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.
.............
वाशी सार्वजनिक रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग
वाशी (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर पार्किंग होत असून, रिक्षा स्टँडमुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. पदपथांवरही दुचाकी पार्किंग केल्याने पादचारी व रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णवाहिकांनादेखील अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
.................
विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन
नेरूळ (बातमीदार) ः व्यसनाधीनतेविरोधात वाशीतील रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूलमध्ये पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश भोसले व संदीप ढवळे यांनी अमली पदार्थ, सायबर क्राइम व मोबाईल गेम्सच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याची प्रतिज्ञा घेतली तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
.....................
कॅन्सरग्रस्तांसाठी रक्तदान शिबिर
खारघर (बातमीदार) ः युवा प्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात ९१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. आमदार प्रशांत ठाकूर व विक्रांत पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
......................
मेडीकव्हर हॉस्पिटलतर्फे अवयवदाता कुटुंबीयांचा सन्मान
खारघर (बातमीदार) ः जागतिक अवयवदानदिनानिमित्त मेडीकव्हर हॉस्पिटलतर्फे अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. या वेळी विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट केले. अवयवदाते समीर पाटील यांनी आपल्या अनुभवातून अवयवदानाने इतरांना नवे जीवन मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात उपस्थितांना अवयवदानासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी डॉ. सनिश श्रृंगारपुरे, डॉ. विकास भिसे, डॉ. अमित नागरीक, डॉ. अमर कुलकर्णी, डॉ. रावसाहेब राठोड, डॉ. दीपक अहिरे आणि डॉ. अदिती जैन मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.