कर्करोगविरोधात पनवेल महापालिका सरसावली
टाटा रुग्णालयाबरोबर करार; २६ आरोग्य केंद्रांत मोफत तपासणी व प्रशिक्षण
खारघर, ता. १६ (बातमीदार) : स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने पनवेल महापालिका व टाटा हॉस्पिटल खारघर यांच्यामध्ये कर्करोग तपासणी व प्रशिक्षण करारनामा करण्यात आला. हा कार्यक्रम पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कराराअंतर्गत महापालिकेच्या सर्व २६ नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्करोग तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होऊन मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, टाटा हॉस्पिटल परळच्या विभागप्रमुख डॉ. शर्मिला पिंगळे, एसीटीआरईसी खारघरचे संचालक राजेश दिक्षित, डॉ. गौरवी मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पिंगळे यांनी कर्करोगाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या कार्यक्रमात नागरिकांना तत्काळ व दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी तीन अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
.............
चौकट
अंगदान जीवन संजीवनी अभियान
पनवेल महापालिका, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय व दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान पंधरवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः व त्यांच्या पत्नीने अवयवदानासाठी अर्ज भरल्याची घोषणा केली. ते म्हणाले, मृत्यूनंतर डोळे, यकृत, त्वचा यांसारखी अवयव दान करून आपण इतरांना जीवनदान देऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.