मुंबई

पालिका करणार उद्या पिवळ्या कचरापेट्यांचे वितरण

CD

विशेष काळजीयोग्य कचरा संकलनासाठी
पालिका करणार उद्या पिवळ्या कचरापेट्यांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ - ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ सेवा मुंबई महापालिकेने कार्यान्वित केली असून, ही सेवा आता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. या कचऱ्याच्या संकलनासाठी ‘पिवळ्या कचरापेटी’ तयार केल्या असून, त्या पेट्यांचे वितरण घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून येत्या सोमवारी (ता १८) करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील विविध आस्थापनांनी या सेवेसाठी नोंदणी करून त्यांच्याकडील घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे वर्गीकरण करून ते महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन पालिकेचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी केले आहे.  

‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांत प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दूषित कापूस, बँडेजेस (जसे की लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठा, नखांनी दूषित झालेले), कालबाह्य औषधी (इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स) आणि ब्यूटी पार्लर, निर्माण होणारा कचरा (वॅक्सिंग स्ट्रिप्स, पीपीई) आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला तरी बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच ते टाकले जाते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आजवर तीन हजार ५३६ आस्थापनांनी नोंदणी केल्याची माहिती उपायुक्त दिघावकर यांनी दिली.
़़़़़़़़़़़़़़
नोंदणीकृत आस्थापना
मुंबई शहर आणि उपनगरातील दोन हजार ९१ गृहनिर्माण संस्था, एक हजार १४६ श्रृंगार केंद्र, २८६ शैक्षणिक संस्था, ४० महिला वसतिगृह आदींचा समावेश आहे.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

‘मी खूप बदनाम आहे, माझा भूतकाळ सडलेला आहे’ असं का म्हणालेल्या रेखा?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT