मुंबई

रोह्यात मंगळवारी पाणी पुरवठा बंद

CD

रोहा शहरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद
देखभाल दुरुस्तीमुळे नगरपालिकेची सूचना
रोहा, ता. १७ (बातमीदार) : रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जलवाहिनी व यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले जात आहे. यामुळे येत्या मंगळवारी (ता. १९) रोहा-अष्टमी शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद राहणार आहे. ही माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी दिली.

रोहा शहराला डोलवहाल पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. ही योजना १९९५ मध्ये तत्कालीन आमदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आली होती. गेल्या ३० वर्षांपासून या योजनेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेचा कालावधी आणि वाढती दैनंदिन गरज लक्षात घेता, यंत्रणा वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करते. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने १९ ऑगस्ट रोजी ‘शट डाऊन’ घेऊन सर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, नगरपालिकेला सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT