मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्‍साहात
पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेणमधील प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेला २१ वर्षे होत असताना आतापर्यंत लाखोंची उलाढाल झाली आहे, तर येणाऱ्या काळात पतसंस्थेची भरभराट अधिक होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जनार्दन जाधव यांनी सांगितले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज महात्मा गांधी वाचनालय येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी सचिव अनंत जाधव यांनी मागील वर्षाचा इतिवृत्त वाचून दाखवला असता, त्याला सभासदांनी मंजुरी देत नवीन सभासदाबरोबरच पतसंस्थेतून सर्वसामान्य आणि गरजूंना कर्ज उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, तर या वेळी पतसंस्थेच्या तक्रार निवारण समितीवर राजेश कांबळे, प्रा. डॉ. डी. के. बामणे, साहेबराव गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सर्वसाधारण सभेला संस्थेचे संचालक मंडळ मारुती खाडे, लक्ष्मण मोरे, अपर्णा वाघमारे, वसंत शिरसाट, अरविंद वाघमारे, शैलेश जाधव, मनस्वी शिरसाट तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...............
पोयनाड येथे युवासेनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे युवासेनेच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव आणि सत्कार समारंभ नुकताच गणेश मंदिर पोयनाड येथे पार पडला. आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना अलिबाग तालुकाप्रमुख निखिल तावडे यांच्या वतीने या सत्कार व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार समारंभात पोयनाड गावामधील विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व श्री गणरायाचे पूजन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थी हे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादन करत असतात, यासह विद्यार्थ्यांना घडविण्यामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या शिक्षकांचादेखील युवासेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना गटनेत्या व राजिपच्या माजी सदस्या मानसी दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, संजीवनी नाईक, भाग्यता पाटील, अनिता गंभीर, समीर पाटील, देवेंद्र तावडे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक, महिला, युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT