मुंबई

वडिलोपार्जित शेतीच खरी दौलत : प्रांताधिकारी खुटवड

CD

वडिलोपार्जित शेतीच खरी दौलत : प्रांताधिकारी खुटवड
रोहा, ता. १७ (बातमीदार) : वडिलोपार्जित शेती हीच खरी दौलत आहे. ती विकू नका, नाहीतर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही, असे प्रतिपादन रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी केले. गोपाळवट येथील प्रगतशील शेतकरी भाऊ डिके यांचा शेताच्या बांधावर सन्मान करताना ते बोलत होते.
गावाच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची दखल घेत खुटवड म्हणाले, की जमिनीचा पोत सुधारला पाहिजे. कृतीशील शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा. डिके यांचा सन्मान हा माझ्या वडिलांच्या कष्टांचा सन्मान असल्यासारखा वाटतो. कार्यक्रमात कुडली येथील महिला आदर्श शेतकरी संज्योत पडवळ यांचाही शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाकडे वळले तर ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे नवे मार्ग खुले होतील. चुलीवरचे जेवण, कोरी चहा, ग्रामीण खेळ, कलात्मक उपक्रम तसेच मासळीचे पदार्थ यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे ते म्हणाले. या सोहळ्यास तालुका कृषी अधिकारी महादेव करे, सिटीझन फोरमचे अध्यक्ष आप्पा देशमुख, शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भगत, संघटक शशिकांत मोरे, दीपक फाउंडेशनचे अनिकेत निकम, बिजामृतचे चेअरमन भारत पाटील, शेतकरी चंद्रकांत लोखंडे, बापूसाहेब पडवळ, डॉ. चव्हाण, ग्रामसेविका पूजा रंगारी यांच्यासह विविध कृषी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT