मुंबई

दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी

CD

दुचाकीस्वार अपघातात गंभीर जखमी
कोनगाव पोलिसांत गुन्हा दाखल
भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : भरधाव वेगाने व निष्काळजीने वाहन चालवणाऱ्या एका पिकअप व्हॅनचालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडक दिल्यानंतर व्हॅनचालक घटनास्थळावरून पळून गेला. कोनगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरीश विजय भोईर (३९, रा. ठाणे) हे त्यांच्या दुचाकी (एमएच-०४/एलजे-४९४९)वरून नाशिककडे जात असताना पिंपळास येथील भूमी वर्ल्डजवळ मागून आलेल्या चारचाकीने (एमएच-०४/केयू-३३०२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे भोईर रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या कंबरेला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कंबरेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातानंतर आरोपी चालक बशीर जैनुद्दीन अन्सारी (२७, रा. नेहरू नगर, नवीवस्ती, भिवंडी) घटनास्थळावरून फरार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT