मुंबई

दहहंडी उत्सवाला शिवसेना, मनसे एकत्र

CD

दहीहंडी उत्सवात शिवसेना-मनसे एकत्र
जुईनगर, ता. १७ (बातमीदार) : शहरातील दहीहंडी उत्सवाला शनिवारी (ता. १६) राजकारणाची झालर पाहायला मिळाली. नवी मुंबईत ठाकरे गट आणि मनसेतर्फे आयोजित दहीहंड्यांच्या व्यसपीठावर दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी वाशीतील मनसे आयोजित हंडीला हजेरी लावली. तर सानपाडा, जुईनगर, नेरूळ येथील शिवसेना आयोजित दहीहंडीत मनसे पदाधिकारी दिसून आले.
सानपाडा, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर या ठिकाणी ठाकरे गटाच्या निष्ठा दहीहंड्यांचे आयोजन केले गेले होते. दहीहंडीला निष्ठा हंडी हा शिंदे गटात गेलेल्या शिवसैनिकांना उपरोधिक टोला असल्याची चर्चा आहे. या दहीहंड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
भाजप आणि काँग्रेसमधून दाखल झालेल्या राजेश भोर, नवनाथ चव्हाण यांनी पहिल्यांदाच ठाकरे गटातर्फे शिवाजी महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हंडीचे आयोजन केले होते. सानपाडा सेक्टर तीन येथे शाखा क्रमांक ७४ तर्फे संजय गव्हाणे व अजय पवार यांनी निष्ठा हंडीचे आयोजन केले होते. जुईनगर येथील गणेश मैदानात माजी नगरसेवक विशाल ससाणे यांनी नशामुक्त नवी मुंबईची जनजागृती करणारे फलक लावून दहीहंडी आयोजित केली. तर एकूण २२ पथकांनी हजेरी लावत बालगोपाळ पथकाने ही हंडी फोडली. बेलापूर येथील उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील यांनी निष्ठा हंडीचे आयोजन केले होते. तर वाशी येथे अभिलेश दंडवते यांनी मनसेतर्फे आयोजित दहीहंडीत अनेक शिवसेना पदाधिकारी एकदिलाने सहभागी होताना दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT