मुंबई

जखमी तरुणाचा २१ दिवसांनंतर मृत्यू

CD

जखमी तरुणाचा
२१ दिवसांनंतर मृत्यू

कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्ड्यांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघातात जखमी झालेल्या कल्याणच्या २८ वर्षीय तरुणाचा २१ दिवसांनी मृत्यू झाला आहे. रोहन शिंगरे असे या तरुणाचे नाव असून रामबाग परिसरात तो राहत होता. ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचा ताे एकुलता एक मुलगा होता.

राेहन २३ जुलैला कामावर जात असताना हा अपघात झाला हाेता. राेहन याच्या मृत्यूने कल्याण परिसरावर शोककळा पसरली आहे. रोहन हा वाशी येथे कामाला होता. २३ जुलैला दुचाकीवरून ताे सकाळी कामावर चालला हाेता. पिंपळेश्वर हॉटेलजवळ खड्ड्यामुळे तोल गेल्याने खाली पडला. त्या वेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकात त्याचा हात अडकला. ट्रकने त्याला काही अंतर फरफटत नेले. नागरिकांनी जखमी रोहनला रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला सानपाडा येथे हलवण्यात आले. हेल्मेट असल्याने डोक्याला इजा झाली नव्‍हती. त्याचा डावा हात काढून टाकण्यात आला हाेता. अखेर उपचारांदरम्यान १५ ऑगस्टला त्याचे निधन झाल्याची माहिती माजी नगरसेविका वैजयंती घोलप यांनी दिली.
----
‘सकाळ’ने अनेकदा वेधले लक्ष
डोंबिवली : कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे, रखडलेले रुंदीकरण याकडे लक्ष वेधून ‘सकाळ’ने अनेकदा अपघाताची शक्यता व्‍यक्त केली हाेती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. रक्षाबंधन आणि दुसऱ्या दिवशी रविवारी कल्याण-शीळ रोडवर अभूतपूर्व वाहनकोंडी झाली हाेती. वाहने चार ते पाच तास या कोंडीत अडकली होती.

नवीन पलावा पुलावरही खड्डे
देसाई खाडी ते काटईनाका अशा नव्या पलावा उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. नुकताच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दोनच दिवसांत या पुलावर खड्डे पडून यावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींचं आव्हान श्याम मानव यांनी स्वीकारलं; पण 'या' मुद्द्यावरुन एकमत होईना

Shaktipith Highway : ​‘शक्तिपीठ’ महामार्गाचा धनदांडग्यांनाच फायदा, शेतकऱ्यांचे मात्र 'पीठ' होणार; नव्या आरेखनाविरोधात शेतकरी आक्रमक

जहाजाचे दोन मालक, एक म्हणतो पाकिस्तानला चला, दुसरा म्हणतो भारतात; अहवाल सीमाशुल्ककडे सोपवला, काय होणार?

Gokul Milk Union Administrator : ‘गोकुळ’ प्रशासक नियुक्ती हाच अंतिम पर्याय, राजकीय मतप्रवाहात; गोकुळच्या दुधात मिठाचा खडा कोणाचा...

Electricity Bill Saving Tips : हवं तेवढं वापरा फॅन, एसी, फ्रीज! पण वीजबिल येणार निम्मं; वापरुन पाहा 'ही' एकदम सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT