मुंबई

श्रावणात बरसल्या आषाढाच्या सरी

CD

श्रावणात बरसल्या आषाढाच्या सरी
गणेशोत्सवात पूर्वा नक्षत्रामुळे मुसळधार पावसाचा इशारा
तळा, ता. १८ (बातमीदार) ः यावर्षीचा पावसाळा अनिश्चिततेने सुरू झाला असला तरी सध्या श्रावणात आषाढाच्या सरी अक्षरशः धो-धो बरसत आहेत. गोपाळकाला दिवशी मघा नक्षत्र सुरू होताच ‘बेडूक वाहन’ नक्षत्रामुळे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पारंपरिक शास्त्रानुसार पावसाचा आणि नक्षत्राचा घट्ट संबंध असल्याचे मानले जाते. यावर्षीही हा अनुभव प्रत्यक्षात येत असल्याचे शेतकरी व जाणकारांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला असताना शनिवारी पूर्वा नक्षत्र उदयास येत आहे. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने त्यावेळीदेखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. कोकण व मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये या कालावधीत मुसळधार सरी कोसळण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला होता. त्यामुळे शेतकरीवर्गात मोठी चिंता निर्माण झाली होती, मात्र आषाढाच्या उत्तरार्धात व श्रावणाच्या प्रारंभी पाऊस दमदार हजेरी लावत असल्याने शेतीला नवे जीवदान मिळाले आहे.
पावसामुळे राज्यातील बहुतेक धरणे भरभरून वाहण्याच्या मार्गावर आहेत. येत्या काही दिवसांत धरणसाठा १०० टक्क्यांवर जाण्याची शक्यता असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. शेतकरीवर्गाने आता खरीप पिकांकडून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवली आहे.
.......................
भक्‍तांची धाकधूक वाढली
पावसाचा जोर गणेशोत्सवासारख्या सणावर पाणी फेरू नये, अशी भक्तांची इच्छा आहे. कोकणात गणेशोत्सव हा फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. गौरी-गणपतीचा सात दिवसांचा सोहळा घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपरिक रितीरिवाजामुळे गावोगाव आनंदाचे वातावरण पसरते. गणेशभक्तांच्या या आनंदात पावसाने अडथळा आणू नये, अशी सर्वांची प्रार्थना आहे. एकीकडे शेतकरी व जलसंपत्तीला लाभदायी पाऊस तर दुसरीकडे सणावाराचे आनंदोत्सव, या दोन्हींत भक्‍तांची धाकधूक वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba River Flood : अंबा नदीने धोका पातळी ओलांडली; भेरव अंबा नदी पुलावरून पाणी, वाहतूक थांबली

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT