मुंबई

अवयवदानाला चालना देण्यासाठी ‘आशां’ची मदत

CD

अवयवदानाला चालना देण्यासाठी ‘आशां’ची मदत
८० हजार आशासेविकांना विशेष प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्यात अवयवदानाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने आशासेविकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेतून प्रत्येक घराघरात अवयवदानाचे महत्त्व पोहोचवले जाणार असून, ८० हजार आशासेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. अवयवदानाबाबत अजूनही समाजात भीती आणि गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे अनेक लोक पुढे येण्यास टाळाटाळ करतात. आशासेविका आता जनसामान्यांशी थेट संवाद साधून हे गैरसमज दूर करण्याची भूमिका बजावतील. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या आशासेविका अवयवदान प्रबोधन चळवळीत नवे बळ देतील.
राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटनेचे संचालक डॉ. आकाश शुक्ला यांनी सांगितले की, राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या चिंताजनकरीत्या वाढली आहे. २०२४ मध्ये ८,२४० रुग्ण अवयवांसाठी प्रतीक्षेत होते, तर आता ही संख्या ९,४१८ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे सात हजारांहून अधिक रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाची वाट पाहत आहेत.
अवयवदानाला चालना देणे ही आजच्या काळातील मोठी गरज असल्याचे आरोग्य विभाग मान्य करतो. अवयव प्रत्यारोपण समितीच्या सातत्यपूर्ण जनजागृती उपक्रमांमुळे गेल्या काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणांची संख्या हळूहळू वाढत आहे. रुग्णांना नवजीवन मिळवून देण्यासाठी समाजाने अवयवदानाचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहनही समितीने केले आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीदेखील अवयवदान चळवळीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.


प्रत्‍येक घरापर्यंत पोहोचणार!
राज्यातील विविध ठिकाणी जनजागृती वाढवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला निर्देश देण्यात आले असून, सामाजिक संस्थांशीही याबाबत समन्वय साधला जात आहे. अवयवदानासाठी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जाणारे आशासेविकांचे जनजागृती अभियान, अवयव प्रत्यारोपण समितीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आरोग्यमंत्र्यांची पुढाकाराची भूमिका यामुळे या चळवळीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT