वकिलांच्या कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
मालाड (बातमीदार) ः स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अंधेरी कोर्ट बार असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी अंधेरी कोर्ट बार असोसिएशनचे सचिव कुणाल फुले यांनी परिश्रम घेतले. बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी पुणे बार असोसिएशन (ओंकार परदेशी) विरुद्ध किल्ला कोर्ट असोसिएशन (नितीन कांबळे) यांच्यात झाली. पुणे बारने बुद्धिबळ स्पर्धेत बाजी मारली. तसेच दुहेरी कॅरम अंतिम सामना अंधेरी कोर्ट बार असोसिएशन विरुद्ध मुंबई शहर दिवाणी न्यायालय यांच्यात रंगला. यामध्ये अंधेरी कोर्ट बार असोसिएशनने बाजी मारली. एकेरी कॅरम स्पर्धेत मुंबई शहर दिवाणी न्यायालय विरुद्ध कल्याण कोर्ट बार असोसिएशन यांच्यामध्ये एकेरी सामना पार पडला. यामध्ये मुंबई शहर दिवाणी न्यायालय विजयी झाले. या स्पर्धेत विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.