मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

कोकण मराठी साहित्य परिषद माणगाव शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर
माणगाव (वार्ताहर) ः कोकणातील साहित्य क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी कोकण मराठी साहित्य परिषद, माणगाव शाखेची आगामी तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी विशेष सर्वसाधारण सभेत निवडण्यात आली. नवीन कार्यकारिणी निवडीनुसार अध्यक्ष पदावर इतिहास अभ्यासक, लेखक रामजी कदम यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले. उपाध्यक्ष गझलकार संगीता नाचपल्ले, सचिव पदावर सुप्रसिद्ध कवयित्री सायराबानू चौगुले तसेच खजिनदार पदी कवी संदेश शिंदे यांची निवड करण्यात आली. मागील चार वर्षांपासून विविध साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून माणगाव शाखा सक्रिय ठेवणारे माजी अध्यक्ष अजित शेडगे यांना जिल्हा प्रतिनिधी तसेच युवा साहित्यिक निखील सुतार यांची युवाशक्तीप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषद माणगाव शाखेच्या सर्वच उपक्रमात हिरीरीने सहभागी होणारे सहसचिव दिगंबर आडीत, कार्यकारिणी सदस्य म्हणून रूपेश शेठ, संतोष गायकवाड, आणि ज्येष्ठ साहित्यिक ज्योती बुटाला यांची निवड सर्वानुमते निश्चित करण्यात आली. नवीन कार्यकारिणी निवडीबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच आगामी तीन वर्षाच्या कार्यकाळात माणगाव शाखेच्या माध्यमातून दिपावली पहाट, मराठी राजभाषा गौरव दिन, महाकवी कालिदास जयंती यांसारख्या उपक्रमांसोबतच नवोदित साहित्यिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत नवनिर्वाचित अध्यक्ष रामजी कदम यांनी व्यक्त केले. नवीन कार्यकारिणी निवड प्रक्रियेत माजी सचिव अपूर्वा जंगम, खजिनदार मधुरा पालांडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
......................
भक्ष्याच्या शोधात पिंजऱ्यात अडकला अजगर
खालापूर (बातमीदार) : मागील काही दिवसापासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचा फटका पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांनादेखील बसला आहे. खोपोलीत भक्ष्याच्या शोधात आलेला अजगर पाळीव पक्षाच्या पिंजऱ्यात अडकून बसल्याची घटना घडली. सुदैवाने जागरूक नागरिकांनी सर्पमित्रांना माहिती दिल्याने अजगर आणि पिंजऱ्यातील पक्ष्यांचा जीव वाचला. खोपोली वैभव नगरी इमारतीत राहणा-या रितेश काळभोर यांनी काही पक्षी पाळले आहेत. दरम्यान सोमवारी भला मोठा अजगर पक्षी खाण्यासाठी पिंजऱ्यात शिरण्याचा प्रयत्न करताना जाळीमध्ये फसला. तेथील रहिवासी वर्षा मोरे यांनी खालापूर ॲनिमल अँड नेचर अवेअरनेस ग्रुपचे सर्पमित्र आणि निसर्गमित्र रोशन पालांडे, अमित पवार आणि योगेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला. तातडीने सर्पमित्र संसाधनसह घटनास्थळी पोहचले. दरम्यान अजगराला सुरक्षित रेस्क्यू केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पावसाळ्यात अनेकदा सर्वत्र पाणी भरल्याने साप सुरक्षित अधिवास आणि भक्ष्य शोधण्यासाठी नागरी वस्तीत शिरतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, तसेच गैरसमजुतीतून सापांना न मारता तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावे, असे आवाहन निसर्ग मित्र योगेश शिंदे यांनी केले आहे.
.......................
व्‍यसनमुक्‍तीबाबत विद्यार्थ्यांशी हितगुज
रोहा (बातमीदार) ः आयुष्यात व्यसनाच्या मोहात पडणार नाही, असे विद्यार्थी दशेतच मनावर बिंबविण्याचे आवाहन कोलाड सहायक पोलिस उपनिरिक्षक निलेश महाडिक यांनी विद्यार्थी वर्गाला केले. रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती व मोबाईलचा अतिवापर, या विषयाबाबत हितगुज करताना ते बोलत होते. यावेळी गोपनीय माहिती अधिकारी नितीन गायकवाड, संस्था सचिव धोंडू कचरे, संचालक धनाजी लोखंडे, वसंत मरवडे, मुख्याध्यापक दीपक जगताप, माजी विद्यार्थी निलेश यांच्यासह सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी त्यांनी सद्या रायगड जिल्ह्यातील काही भागात अंमली पदार्थांचे साठे सापडू लागले आहेत, हे निश्चितच अशोभनीय आहे. अंमली पदार्थ हे हानिकारक असून त्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्याची हानी होते. त्यामुळे विद्यार्थी दशेतच व्यसनांच्या आहारी न जाण्याचा शपथ घेऊन आपल्याबरोबर आपले घर, परिसर, गाव आपल्याला व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी योग्य तो प्रतिसाद देऊन सामुदायिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
.......................
वैजनाथ मंदिरात मंत्री गोगावले यांनी केला अभिषेक
माणगाव (वार्ताहर) ः श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी श्री क्षेत्र गांगवली येथील प्राचीन मंदिरात जाऊन मंत्री भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांनी सपत्नीक भगवान श्री वैजनाथ महादेवाचे पूजा, अभिषेक करून दर्शन घेतले. छत्रपती थोरले शाहू यांचे सहवास लाभलेले ऐतिहासिक वारसा लाभलेले वैजनाथ महादेवाचे दर्शन घेतल्याने मनाला अलौकिक समाधान मिळाले, असे मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. या पवित्र स्थळी भगवान श्री भोलेनाथाच्या चरणी लीन होऊन राज्यातील बळीराजावरील संकट दूर होऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, सर्व समाजघटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना केल्याचे त्‍यांनी सांगितले. पुजेनंतर वैजनाथ देवस्थान, गांगवली यांचे वतीने करण्यात आलेल्या सत्काराचा विनम्रपणे स्वीकार केला. तसेच मोठ्या संख्येने उपस्थित भक्तगण व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थ मंडळ देवस्थानचे विश्वस्त आणि सदस्य, नितीन पवार, अच्युत तोंडलेकर, विजय दाखिणकर, मंगेश तोंडलेकर, संजय शिंदे, शंकर दाखिणकर, महिला मंडळ उपस्थित होते.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT