श्रीवर्धन फ्लाइंग बर्ड्स बर्ड्स रेस्क्यू टीमचा गौरव
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान
श्रीवर्धन, ता. २० (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुक्यात कार्यरत असलेल्या फ्लाइंग बर्ड्स रेस्क्यू टीम या संस्थेला त्यांच्या निःस्वार्थ सामाजिक सेवेबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी अलिबाग येथील रायगड पोलिस मैदानावर झालेल्या समारंभात मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संस्थेला सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल आदी मान्यवर उपस्थित होते. फ्लाइंग बर्ड्स रेस्क्यू टीमच्या वतीने उपाध्यक्ष समीर साठविलकर यांनी हा मानाचा सन्मान स्वीकारला.
फ्लाइंग बर्ड्स वेल्फेअर असोसिएशन ही एक नोंदणीकृत संस्था असून, आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने मदत करण्यासाठी ही संस्था विशेष ओळखली जाते. रस्त्यावर अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत करणे, समुद्रात बुडणाऱ्यांचे जीव वाचवणे, खोल नाले व खड्ड्यात पडलेले किंवा अडकलेले मृतदेह बाहेर काढणे, प्राण्यांना वाचवणे तसेच संकटसमयी पर्यटक आणि शालेय विद्यार्थ्यांना मदत करणे अशा अनेक कामांमध्ये हे पथक आघाडीवर असते. शिवाय गंभीर जखमी रुग्णांना शहरातील रुग्णालयात हलविण्यासाठी आपत्कालीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे हादेखील त्यांच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या पथकाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते हिदायत जमादार, शोएब हमदुले, समीर साठविलकर, जुनैद दुस्ते, शादाब पटेल, इजाज कुमार, नितीन पतंगे, अफाक भोरे, अली झांजो, सुजित भोकरे आणि आबिद पावसकर करीत आहेत. त्यांच्यासोबत कार्यरत असलेले अनेक धाडसी स्वयंसेवक विविध प्रसंगांत लोकांना जीवदान देत आहेत. या निःस्वार्थ कार्यामुळे श्रीवर्धनसह रायगड जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळते. या गौरवाबद्दल बोलताना उपस्थित मान्यवरांनी फ्लाइंग बर्ड्स रेस्क्यू टीमच्या योगदानाचे कौतुक केले आणि अशा सेवाभावी संस्थांमुळे समाजातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा आधार मिळतो, असे प्रतिपादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.