सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : शहरात मंगळवारी (ता. १९) सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच रस्त्यांना नदी स्वरूप प्राप्त झाले होते. सोमवारप्रमाणे मंगळवारीही जनजीवन विस्कळित झाले होते. ठाण्याचे हदय अशी ओळख असलेल्या येऊर परिसरातही पाणी साचले होते.
ठाणे रेल्वेस्थानकात मंगळवारीही गर्दी पाहण्यास मिळाली होती. या वेळी रेल्वेप्रशासनाद्वारे सूचना देण्यात आल्या. तसेच ठाणे रेल्वेस्थानकासह कळवा आणि मुंब्रा रेल्वेस्थानकातील रूळांवर पाणी साचले होते. गेल्या २४ तासांत ठाणे शहरात तब्बल २२३.७३ मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच मंगळवारी सकाळी साडेआठ ते साडेनऊ या एका तासात २९.४६ पावसाची नोंद झाली. त्यानंतरही पाऊस सुरू होता. तर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ६२.२१ मिमी पाऊस झाला.
झाडे कोसळल्याने चार गाड्यांचे नुकसान
शहरातील नौपाडा, कळवा महात्मा फुलेनगर, कोपरी नाखवा हायस्कूल, शिवाईनगर, कळवा-विटावा, दिवा कल्याण रोड या ठिकाणी झाडे पडली असून, यामध्ये नौपाड्यात तीन दुचाकीचे व दुकानासमोर बांधलेल्या प्लास्टिक शेडचे नुकसान झाले आहे. दिव्यात एका गाडीवर झाड पडल्याने गाडीचे नुकसान झाले आहे.
या ठिकाणी साचले पाणी
ठाणे शहरातील वंदना टॉकीज, दिवा मुंब्रा देवी कॉलनी, घोडबंदर रोडवरील बांगला क्रमांक १९ च्या बाजूला, आंबेडकरनगर नाला, दिवा दातिवली, श्रीरंग सोसायटी, कोर्ट नाका, माजीवडा साईनाथ नगर, येऊर गावातील राम मंदिर जवळ आणि कोपरकर बंगल्याजवळ तसेच कोपरीत कोळी स्मशानभूमी आणि डायघर गावात दत्त मंदिरच्या बाजूचा संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
पडझड झालेली ठिकाणे
ठाणे शहरातील मुंब्रा संजयनगर परिसरात घराची भिंत कोसळली. घोडबंदर रोडवरील श्री माँ हायस्कूल शाळेची संरक्षक भिंतीचा काही भाग पडला. तसेच कळव्यात नाल्याची संरक्षक भिंत ढासळली आहे.
येऊर गाव जलमय
दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे निसर्गरम्य येऊर गावही जलमय झाले. येथील गावकऱ्यांच्या घरात पाणी भरल्याने तारांबळ उडाली. येथील भेंडीपाडाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता. राम मंदिर परिसरात काही बंगलेवाल्यांनी नाल्यांवर पाईप टाकून प्रवेशद्वार केल्यामुळे हा फटका बसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. नाल्याच्या पाईपमध्ये कचरा अडकल्यामुळे रस्त्यावर आणि रहिवाशांच्या घरी पाणी साचल्याचे सांगण्यात आले.
पहाटेपासून दुपारपर्यंत १२९.७९ मिमी पाऊस
ठाणे पालिका क्षेत्रामध्ये सोमवारी ९.३० ते मंगळवारी ८.३० वाजेपर्यंत तब्बल २२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पहाटेपासून पावसाचा जोर दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पहाटे साडेचार ते दुपारी साडे अकरा वाजेपर्यंत १२९ मिमी पावसाची नोंद झाली.
वेळ मिमी
४.३०- १०.९३
५.३०- १०.६६
६.३०- १०.४२
७.३०- २७.६९
८.३०- २१.३४
९.३०- २९.४६
१०.३०- ०९.३९
११.३०- ०९.९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.