पालघर, ता. १९ (बातमीदार) : जिल्ह्याला आज मंगळवारी (ता. १९) अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून प्राप्त झाला होता. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली होती. खाडी आणि नदी, नाला अशा पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले होते.
नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.
मदतीसाठी संपर्क क्रमांक
०२५२५-२९७४७४
८२३७९७८८७३
टोल फ्री १०७७