मुंबई

भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सिडकोवर मोर्चा

CD

भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सिडकोवर मोर्चा

वाशी, ता. २० (बातमीदार)ः नवी मुंबईतील भूमिपुत्रांना साडेबारा टक्क्यातून राहिलेला भूखंड देण्यात यावा. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यात याव्या, तसेच सिडकोच्या बैठ्या चाळीतील घरांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्याच्या मागण्यासाठी सिडको कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी (ता. २०) मोर्चा काढण्यात आला होता.
बेलापूर मेट्रो स्थानकापासून सिडको मुख्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासह शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. या वेळी सिडकोच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाआधी शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाही; पण येथील भूखंड बिल्डरांच्या घशात घातले गेल्याचा आरोप केला. तसेच उरण, जेएनपीए, खारघर, विमानतळासाठीचे भूखंड बिल्डरांना दिले गेले आहे. अशावर कारवाई झाली नाही तर सिडकोविरोधात पुन्हा गणेशोत्सवानंतर मोर्चा काढण्याचा इशारादेखील त्यांनी दिला. या वेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली.
-----------------------------
मित्रपक्षांची मोर्चाकडे पाठ
महाविकास आघाडीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला असला तरी शिवसेना ठाकरे गट तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलनापासून लांब असल्याचे दिसून आले. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवी मुंबई प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे बबन पाटील उपस्थित होते. या वेळी मोर्चाला कोणत्याही प्रकाराचे गालबोट लागू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: स्मृती मानधना - प्रतिका रावल ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हा' पराक्रम करणारी जगातील पहिली जोडी; ५२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

बकरी ईदला आम्ही ज्ञान पाजळत नाही, तुम्ही फटाक्यांवर बोलू नका; दिवाळीआधी धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

Photos : जस्टिन ट्रुडो 'या' सिक्रेट गायिकेला किस करतानाचा फोटो व्हायरल; अर्धनग्न अवस्थेत मिठीत घेताना दिसले कॅनडाचे माजी पंतप्रधान

Pune : पाषाणमध्ये नदीत वाहून आला मृतदेह, ५-६ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता; हत्या की आत्महत्या?

School Fee: आता युपीआयद्वारे एका क्लिकवर शाळेची फी जमा करता येणार! केंद्र सरकारचे मोठे पाऊल, आदेशाचे पत्र जारी

SCROLL FOR NEXT