मुंबई

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. ठाणे बँकेची ६७ वी वार्षिक संपन्न

CD

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६७वी वार्षिक संपन्न
विरार ता. २० (बातमीदार) : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. ठाणे बँकेची ६७वी वार्षिक अधिमंडळ सभा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोज, ठाणे येथे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार संजय केळकर, माजी आमदार राजेश पाटील, पांडुरंग बरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.
या सभेस बँकेचे भागधारक, खातेदार, ठेवीदार, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये बँकेस २०२३-२४ या वर्षाकरिता नाबार्डमार्फत प्राप्त ‘उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशेष कौतुकोद्गार काढले. बँकेने रु. २१५.०० कोटींचा नफा प्राप्त केलेला असून, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया, मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजना यामध्ये बँकेने कर्जवाटप करून तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली असून, गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुनर्विकासाकरिता बँक करीत असलेल्या कर्ज वाटपाचा व सहकार्याचा विशेष उल्लेख करून शासन दरबारी बँकेस येणाऱ्या अडचणींकरिता पाठपुरावा आपण करू, असे आश्वासन दिले. बँकेच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करताना अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी बँकेच्या भागधारक व खातेदार यांच्या विश्वासास पात्र ठरून नेत्रदीपक कामगिरी करीत असल्याचे नमुद केले. तसेच बँकेच्या भागधारकांनी विचारलेल्या प्रश्नांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे यांनी अत्यंत समर्पक उत्तरे दिली व बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्याचे नमूद करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पेपरफुटीला १० कोटींचा दंड! परीक्षा दिल्यास शुल्कही परत मिळणार

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ साठी राजगड तालुक्यात कोट्यवधींचा निधी; आडवली-वेल्हे रस्त्याच्या कामात त्रुटी असल्याचा नागरिकांचा आरोप

Spiritual Education : १९ राज्यांतील १६० स्पर्धकांचा सहभाग; चिन्मय मिशनच्या राष्ट्रीय गीता पठण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पटकावली विजेतेपदे

Maharashtra Live news : माहुलीत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध, मोजणीचे वाहन परतवून लावले

MPSC Paper Leak: पेपर फोडला तर १० वर्षे तुरुंगवास! १० कोटींचा दंड अन् मालमत्ताही जप्त होणार; सरकार आणणार कठोर कायदा

SCROLL FOR NEXT