मुंबई

मुंबईकरांसाठी मेट्रो ठरतेय लाईफलाईन!

CD

लोकल नव्हे, मेट्रो ठरतेय जीवनवाहिनी!
चार दिवसांत २० लाख मुंबईकरांनी केला प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबईत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीसह लोकल सेवा विस्कळित झाली; मात्र कोणत्याही अडथळ्याविना मेट्रो सेवा सुरळीत सुरू होती. सर्वत्र जोरधारा सुरू असताना मुंबईकरांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली. १६-१९ ऑगस्ट या चार दिवसांत तब्बल २० लाखांहून अधिक मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे मेट्रो आता मुंबईकरांची जीवनवाहिनी ठरताना दिसत आहे.
सध्या मुंबईत घाटकोपर-वर्सोवा मेट्रो-१, अंधेरी-दहिसर-गुंदवली या मार्गावर मेट्रो-२ ए आणि ७, तर आरे-वरळीदरम्यान मेट्रो-३ चालवली जात आहे. वाहतूक कोंडीशिवाय कमी वेळेत गारेगार प्रवास होत आहे. सुरुवातीला महागडा वाटणाऱ्या मेट्रो प्रवासाकडे आता सर्वसामान्यांचाही ओढा वाढला आहे. गेले चार दिवस मुसळधार पाऊस असताना मेट्रोने २० लाख ८६ हजार २३५ जणांनी प्रवास केला. पावसामुळे वाहतुकीची सर्व साधने ठप्प झाली असताना मेट्रो सेवा मात्र सुरू राहिल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना उशिरा का होईना, पण मेट्रोने इच्छितस्थळी पोहोचता आले.
---
लोकलवरील भार कमी होणार
एमएमआरडीएकडून मुंबईसह एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. पुढील पाच-सहा वर्षांत इतर मेट्रो मार्ग टप्प्याटप्प्याने ते सेवेत येणार आहेत. सर्व मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईकरांसाठी मेट्रो खऱ्या अर्थाने मोठा आधार ठरणार आहे. तसेच मेट्रोच्या जाळ्यामुळे सध्याच्या लोकलवरील भार हलका होईल तसेच रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होईल, असा वाहतूक तज्ज्ञांचा अंदाज आहे.
---
चार दिवसांतील मेट्रो प्रवासी
मेट्रो २ अ व ७ - ४,७६,५८८
मेट्रो ३ - १,६१,९९४
मेट्रो १ - ११,७०,०००
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: हे फक्त पुण्यातच! रस्त्यावर शेण साठविल्याच प्रकरण न्यायालयात गेलं अन् .... न्यायालयाने काय दिली शिक्षा?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग १२ व्या दिवशी घसरण, खरेदीची उत्तम संधी? जाणून घ्या आजचा ताजा भाव

योगिता चव्हाणच्या नव्या गणेशगीताचा धडाका! ‘शंकराचा बाळ आला’गाण्यात सैनिक आईच्या भूमिकेत, सोशल मीडियावर व्हायरल

12th Board Students: १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता एनसीईआरटीकडून मिळणार मोफत गणिताचे ‘ट्युशन’

11th Admission 2025: अकरावी प्रवेशाच्या खुल्या फेरीला प्रतिसाद; प्राधान्यक्रमानुसार ८५ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT