मुंबई

आरटीआयचे खच्चीकरण थांबवा

CD

आरटीआयचे खच्चीकरण थांबवा
सजग नागरिक मंचची राज्य माहिती आयोगाकडे मागणी
तुर्भे, ता. ३१ (वार्ताहर) : राज्य माहिती आयोगाने अलीकडेच मोठ्या प्रमाणावर आरटीआय अपील फेटाळल्याच्या निर्णयावर नवी मुंबईतील सजग नागरिक मंच यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. आरटीआयची धार बोथट करणे हा नागरिकांच्या लोकशाही हक्कावर घाला आहे. आयोगाने एकतर्फी दृष्टिकोन थांबवून पारदर्शकतेचे रक्षण करण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे निवेदनाद्वारे मंचाने आयोगाला स्पष्ट इशारा दिला आहे.
माहितीचा अधिकार (आरटीआय) कायदा हा लोकशाहीतील पारदर्शकतेचा पाया आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून या कायद्याची गळचेपी सुरू असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांकडून वारंवार केला जात आहे. माहिती न देण्याचे वाढते प्रकार, आयोगाची उदासीन कार्यपद्धती आणि अपील फेटाळण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. मंचाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की आरटीआय म्हणजे लोकशाहीचा श्वास आहे. त्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीला मृत्युदंड देण्यासारखे आहे. प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि राज्यातील सर्व विभागीय माहिती आयुक्तांनादेखील पाठवले आहे. आरटीआय कार्यकर्त्यांनी आयोगाकडे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेते. आयोगाने तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीत तर पारदर्शकतेवरील विश्वास पूर्णपणे कोलमडेल. नागरिकांचा माहिती हक्क अबाधित ठेवण्यासाठी आयोगाने नोकरशाहीची खेळी ओळखून सक्रिय भूमिका घ्यावी, असे आरटीआय कार्यकर्ते सुधीर लक्ष्मीकांत दाणी यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT