मुंबई

पनवेलमध्ये ८५ हजार दुबार मतदारांची नोंद;

CD

पनवेलमध्ये ८५ हजार दुबार मतदारांची नोंद;
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी पडताळणी मागणी
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः पनवेल विधानसभा मतदारसंघात मतचोरीचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. तब्बल ८५ हजार २११ दुबार मतदार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ११ हजार ६०० जणांनी विधानसभेला दोनदा मतदान केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळाराम पाटील यांनी केला आहे. त्‍यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही दुबार नावे मतदार यादीतून कमी करावीत, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिला आहे.
बाळाराम पाटील यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; मात्र भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पाटील यांनी मतचोरीचे पुरावे सादर करत, या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मतचोरीचे प्रकार झाला असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील मतचोरीच्या मुद्यावरून देशभरात आवाज उठवला असून, पनवेलमधील प्रकरण हे त्याचे ठळक उदाहरण असल्याचे सांगण्यात येत आहे. पाटील यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाने या सर्व दुबार नावे तातडीने वगळण्याचे आदेश दिले असतानाही निवडणूक अधिकारी आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. लोकशाहीची उघड हत्या सुरू आहे, ती तातडीने थांबवली पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
..............
न्यायालयाच्या आदेशानंतरही कानाडोळा
पनवेल आणि उरण या दोन्ही मतदारसंघात नावे असलेले मतदार, ऐरोली मतदारसंघ नावे असलेले मतदार, पनवेल आणि बेलापूर या मतदारसंघात दोनदा नावे असलेले मतदार असे एकूण ८५ हजार २११ दुबार नावे आढळली आहेत. यापैकी ५८० मतदारांचा काहीच ठावठिकाणा नाही, अशी माहिती बाळाराम पाटील यांनी दिली आहे. तसेच अधिकाऱ्यांनी न्यायालयीन आदेशांकडे कानाडोळा केल्याचा आरोपही माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात ता. १० सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकरणाची तक्रार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यानंतर ता. १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल झाली. सुनावणीनंतर हायकोर्टाने दुबार नावे वगळण्याचे स्पष्ट आदेश दिले; मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप बाळाराम पाटील यांनी केला.
............
चौकट
दुबार मतदारांची सविस्तर आकडेवारी
पनवेल मतदारसंघातच दोनदा नावे असलेले २५, ८५५ मतदार
पनवेल आणि उरण या दोन्ही मतदारसंघात नावे असलेले २७, २७५ मतदार
ऐरोली मतदारसंघात नावे असलेले १६, ०९६ मतदार
पनवेल आणि बेलापूर या मतदारसंघात दोनदा नावे असलेले १५, ३९७ मतदार
.............
कोट
पनवेलमधील मतदार यादीमधील दुबार असलेली नावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी कमी करावीत. त्यानंतर पनवेलमध्ये मतदान घ्यावे, अन्यथा निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात येईल.
-बाळाराम पाटील, माजी आमदार विधानपरिषद

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT