संवाद अन् आदान-प्रदानांनी नव्या पिढीत स्फुरले चैतन्य
‘नेक्स्ट जेन-लीडर्स गाला’मध्ये युवा उद्योजकांचा संवाद
मुंबई, ता. २१ : मुंबई, नवी मुंबईतील युवा उद्योजकांनी आपल्या उद्योग-व्यवसायाची आणि त्यातील असलेल्या संकल्पना, देशभरात विविध क्षेत्रांत असलेल्या व्यवसायवृद्धींच्या संधी याची एकमेकांना माहिती देऊन युवा उद्योजकांमध्ये ‘नेक्स्ट जेन-लीडर्स गाला’ उपक्रमात संवाद आणि त्यातून चैतन्य स्फुरले.
या उपक्रमात एकमेकांच्या व्यवसायाची माहिती आणि त्याची आदान-प्रदान करत त्यासाठीची अनुभूती नव्या पिढीतील तरुण व्यवसाय-उद्योजकांना मिळाली. या नव्या पिढीतील शिक्षण, बांधकाम, रियल इस्टेट, हॉटेल उद्योग, सेवा क्षेत्र, रिटेल ज्वेलरी, सेवा सुरक्षा, अन्न आणि पेय आदी व्यवसाय उद्योग क्षेत्रातील युवा उद्योजक, व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
परंपरागत आणि वारशाने मिळालेल्या कौटुंबिक व्यवसाय उद्योगाला अधिकाधिक विकसित कसे करता येईल, यासाठी केवळ नावासाठी नव्हे तर नवकल्पनांसाठी आणि व्यवसाय उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी, काय करता येईल, यासाठी नवीन मैत्रीचे सेतू बांधता येतील काय, या उदात्त हेतूने युवा उद्योजकांनी एकमेकांना भेटून चर्चा केली. एकमेकांची ओळख करून घेत आपले परिचय दिले. या संवाद भेटीच्या अनुभूतीदरम्यान दुसऱ्यांच्या संकल्पना, त्यांच्या व्यवसायातील वृद्धी समजून घेत आपला पिढीजात व्यवसाय कसा अधिक विकसित होईल, यासाठी काय करावे लागेल, यासाठी आपल्या व्यवसायवृद्धीचे व्हिजन मांडून त्यावर चर्चा केल्या. बांधकाम, रियल इस्टेटसारख्या एकाच क्षेत्रातील उद्योजकांनी आणखी कोणते बदल, संधी आहेत, याची एकमेकांना देवाणघेवाण केली. मुंबई, नवी मुंबईत एकमेकांच्या व्यवसाय, उद्योगांसाठी युवा उद्योजकांना पहिल्यांदाच ‘नेक्स्ट जेन-लीडर्स गाला’मधून गाठीभेटीचा आणि संवाद करण्याचा योग मिळाल्याचे बोलून दाखवले.
शिक्षण, हॉटेल उद्योग, सेवा क्षेत्र, रिटेल ज्वेलरी आदी क्षेत्रांत आपल्या वडील, आजोबांनी उभ्या केलेल्या व्यवसायाला लागलेला वेळ आणि आपण तो सांभाळताना त्याचे ठरविलेले व्हिजन, त्यात होत असलेला विकास याची माहिती देत युवा उद्योजकांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अगदी उत्साहाच्या वातावरणात एकमेकांबद्दल जाणून घेत संवाद साधला.
--
सहभागी युवा व्यावसायिक-उद्योजक
तन्मय शेवाळे (हॉस्पिलिटी, रिसोर्ट), महेश कुलकर्णी (अन्न आणि पेय), मयूरेश केणी (रियल इस्टेट), नील पेठे (ज्वेलरी), मंथन मेहता (रियल इस्टेट), निखिल चौधरी (रिअल इस्टेट), तनीश पवार (सेवा-सुरक्षा), राजेश वायाळ (रियल इस्टेट), राहुल इथापे (हॉटेल व्यवसाय), रोहन लाड (सेवा व्यवस्थापन), मोक्ष भतिजा (रियल इस्टेट), अंश भतिजा (रियल इस्टेट), श्रेयांश ठक्कर (हॉस्पिलिटी, अन्न), रोहन शर्मा (मीडिया आणि प्रोडक्शन हाउस), पराग लागू (रिटेल ज्वेलरी), आर्यन झा (शिक्षण) आणि सोनावी लाड आदी.
--
युवा उद्योजकांची सकारात्मक उत्तरे
गांधी यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना सहभागी युवा उद्योजकांनी अत्यंत सकारात्मक उत्तरे देऊन त्याद्वारे संवाद साधला. या वेळी काहींनी आपण व्यवसायात आहो; पण काय बदल घडवला, हे विचारले गेले नव्हते. आज पहिल्यांदा त्याचा विचार केला असल्याचे स्पष्ट केले. काहींनी आतापर्यंत आपण व्यवसायात फक्त सहभागी होतो. आता पुढे काही तरी देण्याची वेळ आली आहे. ‘नेक्स्ट जेन’मधून खूप काही शिकायला मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.