झेडपीच्या शाळांना मिळाला सौरप्रकाश
देखरेखीसाठी रिमोट मॉनिटरिंग सिस्टम प्रणाली कार्यान्वित करणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २०: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यात निधी अभावी अनेकदा वीज पुरवठा खंडित होणे, त्यामुळे अज्ञापानात शिक्षकांना येणाऱ्या अडचणी याची दाखल घेत, ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे सौरउर्जीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ५३ शाळांचे सौरऊर्जीकरण करण्यात आल्यानंतर आता उर्वरित शाळा देखील सौर प्रकाशने उजळण्यात येणार असून आता उर्वरित शाळा देखील सौर ऊर्जीकरण करण्याचा विचार सुरू असून त्यासाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांचे वीज देयक न भरल्यामुळे अनेकदा शाळेचे मीटर काढून नेण्याचे प्रकार घडले होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही अडथळा निर्माण होत होता. याची दाखल घेत, लक्षात घेऊन मुरबाड तालुक्यातील मिल्हे जिल्हा परिषद शाळेत सौरऊर्जेचा प्रयोग करण्यात आला होता. या शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग भरत असून सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे वर्षभराचे वीजदेयक २२ ते २३ हजार रुपयांपर्यंत येत होते. हा प्रकार टाळण्यासाठी महावितरणच्या नेट मीटरिंग योजनेंतर्गत साधारणता: ३ ते ४ किलो वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२८ पैकी ५३ शाळांचे सौरऊर्जीकरण करण्यात आले. त्यामुळे वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. त्यातून या शाळेची सुटका झाली आहे.
या शाळेवरील सौरउर्जा प्रकल्प हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील झेडपीच्या शाळांवर सौरउर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात टप्याटप्याने शाळांचे सौर उर्जीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील उर्वरित शाळांमध्ये सौरउर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी अडीच कोटींच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली. तसेच लवकरच शाळा निवड करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पांमुळे वीज बिलामध्ये बचत होवून वीज बिल शून्यावर येणार असल्याचा दावा देखील जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
चौकट
नवीन प्रकल्प सुरु
मिल्हे गावात एक बंद अवस्थेतील सौरऊर्जा प्रकल्प पडून होता. या प्रकल्पातील २ बाय ३ आकाराच्या आठ सोलर प्लेट जिल्हा परिषदेच्या शाळेत आणून हा प्रकल्प सुरु केला असून तेथील वीज बिल शून्यावर आले आहे.
चौकट
वीज बिल येणार शून्यावर
ठाणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यात ५३ शाळा सौर ऊर्जीकरण केल्यानंतर आता प्रशासनाने उर्वरित शाळा देखील सौरऊर्जीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यावर देखरेख ठेवण्यासाठी आरएमएस रिमोट मॉनिटरिंग सिस्टम प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.