मुंबई

६ फूटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे - आयुक्त सौरभ राव

CD

६ फूटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच
ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव व फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा दीड पट जास्तीची विसर्जन व्यवस्था केली असून हरित विसर्जन ॲपही ठाणे महापालिकेने तयार केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेशोत्सव यंदाही दरवर्षीच्याच उत्साहाने साजरा करूया. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशिवार्दाने उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया, असे आवाहनही आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. यंदा २३ कृत्रिम तलाव, ७७ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरती विसर्जन केंद्र, ९ खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३४ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. खाडी घाट येथे फक्त ६ फूटाच्या वरील गणेशमूर्त्यांचे विसर्जन केले जाईल असेही आयुक्तांनी नमूद केले. यची दाखल घेत, अतिरिक्त विसर्जन व्यवस्थाकरण्यात आली आहे.

टाकी विसर्जन व्यवस्था
- उथळसर प्रभाग समिती
रुस्तमजी १, रुस्तमजी २ (अटायलर बिल्डींग), परुळेकर मैदान- सिध्देश्वर टाकी, ऋतुपार्क शितल डेअरी समोर, परमार्थ निकेतन समोर, मुख्यालयाजवळ, स्वातंत्र सावरकर मैदान, परमार्थ निकेतन कृत्रिम तलाव- आंबेघोसाळे, रुणवाल नगर येथे ठा.म.पा. चे जागेमध्ये (अतिरिक्त) व्यवस्था करण्यात आली आहे.

नौपाडा प्रभाग समिती
रहेजा संकुल, कशिश पार्क, सदगुरु गार्डन-कोपरी, बारा बंगला-कोपरी, प्र.क्र. 20 मध्ये राऊत स्कुल जवळ, प्र.क्र. 21 मध्ये भक्ती मंदिर, प्र.क्र. 22 मध्ये गणेश टॉकीज कृत्रिम तलाव- मासुंदा दत्त घाट, कोपरी कृत्रिम तलाव अष्टविनायक चौक जवळ व्यवस्था करण्यात आली आहे.

कळवा प्रभाग समितीत
९० फिट रोड कळवा, सह्याद्री शाळा, सायबा क्रीडा नगरी मनिषा नगर, खारेगाव नाका पोलीस चौकीमागील मैदान, कळवा पूर्व, विटावा-कर विभाग कार्यालय, कळवा-गावदेवी मैदान निसर्ग उद्यान परिसर कळवा (३) कृत्रिम तलाव- खारीगांव कृत्रिम तलाव, घोलाई नगर कळवा(पू), न्यु शिवाजी नगर कळवा तलाव, रेल्वे विसर्जन घाटाजवळ विटावा परिसरात विसर्जन करता येईल.

दिवा प्रभाग समिती
पडले बीएसयुपी दिवा, माय सिटी-दिवा प्रभाग समिती, रिव्हरवुड कॉम्पलेक्स, अरिहंत आरोही-कल्याण शिळ रोड, दिवा महोत्सव मैदान-दिवा शिळ रोड, मुक्ता हाईट्स, निर्मल नगरी, सुदामा रिजेन्सी-खर्डी, ए. एन. डी. कॉम्प्लेक्स-आगासन कृत्रिम तलाव- दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, पडले गाव येथील सरस्वती शाळेजवळ विसर्जन करता येईल.

मुंब्रा प्रभाग समिती
शंकर मंदिर तलाव, बाबाजी पाटील वाडी विसर्जन घाट, आनंद कोळीवाडा घाट, राणानगर घाट, रेतीबंदर घाट कृत्रिम तलाव- शंकर मंदिर तलाव विसर्जन घाटाजवळ.

माजिवडा प्रभाग समिती
स्प्रिंग हिल सोसायटी-वाघबीळ ते सरस्वती स्कूल रस्ता, विजयनगरी ॲनेक्स, लोढा लक्झरीया- माजिवडा, अर्बन पार्क गार्डन, हायलॅण्ड मैदान, बाळकुम साकेत घाट, दोस्ती काऊंटी बाळकुम, लोढा स्प्लेंडोरा, लोढा अमारा, वाघबीळ घाट कृत्रिम तलाव- निलकंठ वुडस-टिकुजीनी वाडी कृत्रिम तलाव, रेवाळे कृत्रिम तलाव, बोरीवडे गाव येथील कृत्रिमतलाव, ब्रम्हांड ऋतुपार्क, कृत्रिम तलाव, हिरानंदानी, न्यू हॉरीझॉन जवळील TMC मैदान, कोलशेत विसर्जन महाघाट, गायमुख विसर्जन महाघाट, बाळकुम कशेळी विसर्जन घाट

लोकमान्यनगर प्रभाग समिती
लोकमान्य नगर बस स्टॉप, लक्ष्मी पार्क फेज 1-सिध्दिविनायक उद्यान परिसर, आचार्य आत्रे मार्ग- कोरस नक्षत्र संकुल परिसर, दोस्ती विहार संकुल परिसर, पु. ल. देशपांडे मार्ग-रुणवाल प्लाझा परिसर, लोकमान्य नगर बस स्टॉप, दोस्ती विहार संकुल परिसर

वागळे प्रभाग समिती
नेप्चुन एलिमेंन्ट कंपनीजवळ, पासपोर्ट ऑफीसजवळ, पाण्याच्या टाकीजवळ- श्रीनगर, अय्यप्पा मंदिरासमोर, श्रीनगर (२ टँक), हिंदूस्तान हॉटेलजवळ-अंबिका नगर, नेप्चुन कंपनी जवळ, पासपोर्ट ऑफिस जवळ, आय आय टी सर्कल जवळ (२ टँक), हॅप्पी मॅन जवळ (१ टँक), रतनबाई कंपाऊंड कृत्रिम तलाव- रायलीदेवी कृत्रिम तलाव-१, रायलादेवी कृत्रिम तलाव-२

वर्तकनगर प्रभाग समिती
वसंत विहार क्लब हाऊस, समता नगर वेलफेअर सेंटर, पवार नगर बस स्टॉपजवळ, स्वामी विवेकानंदनगर (म्हाडा वसाहत), सिध्दांचल संकुल-इलाईट गार्डनजवळ, समतानगर तारांगण, हाईड पार्क संकुल, उन्नती गार्डन, देवदर्शन डोंगरीपाडा कृत्रिम तलाव- उपवन तलाव परिसर विसर्जन व्यवस्था वर्तकनगर नाका स्वागत कक्ष, देवदयानगर स्वागत कक्ष

चौकट
दोन सत्रात स्वतंत्र मनुष्यबळ
विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच घाट विसर्जनस्थळी क्रेन आणि वाढीव बार्ज ठेवण्यात येणार आहेत. तरी गणेशभक्तांनी विसर्जनस्थळी नेमण्यात आलेल्‌या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच विसर्जनस्थळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असेही आयुक्तांनी नमूद केले.

चौकट
हरित विसर्जन ॲप
हरित विसर्जन ॲपमुळे नागरीकांना त्यांच्या नजीक परिसरात कुठे विसर्जन व्यवस्था आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच ठामपाने फिरत्या विसर्जन व्यवस्थेबाबत तयार केलेले मार्गही दिले जाणार आहे. तरी नागरिकांनी हरित विसर्जन ॲपवर नोंदणी करावी व शासनाचे अनुपालन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT