हरविलेल्या व्यक्तीचा शोध
ठाणे, ता. २१ : स्वप्नील तेली हा ४३ वर्षीय तरुण बेपत्ता झालेला आहे. खारेगाव येथील पाखाडी परिसरात राहणारा तरुण हरविल्याची नोंद ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अंगाने सडपातळ, रंग गोरा, चेहरा उभट, केस बारीक, नाक सरळ, उंची पाच फूट तीन इंच, अंगात पिवळ्या रंगाचा फुल शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट, बोलताना अडखळतो, हिंदी बोलतो, असे स्वप्नील तेलीचे वर्णन आहे. या वर्णनाची व्यक्ती जर कोणास आढळल्यास ठाणेनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे नगर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार व्ही. के. कुवरा यांनी केले आहे.