कोकणकरांचो स्वागत असो
पळस्पा फाट्यावर खड्ड्यांमुळे कोंडी, प्रवासात विघ्न
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २१ : मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रवेशद्वारावरील पळस्पा जंक्शनवर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असल्याने गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
पनवेलहून पळस्पा जंक्शनवर पावसाळी नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने चिखल साचला आहे. उरलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. टी पॉइंटकडून पळस्पा जंक्शन येणाऱ्या मार्गावर खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचे पळस्पा जंक्शन येथे चाकरमान्यांचा प्रवासाचा श्री गणेशा खड्ड्यांतून होणार आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. वाहनचालकांना पुढे सरकणे कठीण झाले आहे. कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांची याच मार्गावरून पुढे मार्गस्थ होतात. मात्र प्रवेशद्वारावरच ही गंभीर अडचण आल्याने प्रवासाच्या सुरुवातीलाच त्रासदायक अनुभव येण्याची शक्यता आहे.
-------------------------------------
अटल सेतूवर अधिक भार
- रायगड, कोकणात जाण्यासाठी अटल सेतूचा वापर वाढण्याची शक्यता असल्याने मुंबईहून पळस्पामार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पळस्पे फाटा ते अटल सेतूवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
- कळंबोली सर्कलवरून टी पॉइंटमार्गे पळस्पा जंक्शन येथे जाणारे वाहतूक, अटल सेतूवरून पळस्पा जंक्शनमार्गे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागणार आहेत.
----------------------------------
द्रुतगतीवर दुहेरी मनस्ताप
गोवा महामार्गावरील कोंडीचा मनस्ताप टाळण्यासाठी कोल्हापूरमार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा वाहनचालक अवलंब करतात. परंतु द्रुतगती महामार्ग सोडल्यानंतर पुणे बाह्यमार्गाने पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे, पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात उतरणाऱ्या सर्व घाट रस्त्यांची झालेल्या दुरवस्थेमुळे चाकरमान्यांना दुहेरी मनस्ताप होणार आहे.
----------------------------------
सेवा रस्त्याची दुरवस्था
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ साठी तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मार्गावर दोन्ही बाजूंचे सेवा रस्ते डांबरी आहेत. पण अवजड वाहनांमुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या मार्गांचे काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव असला तरी कार्यवाही झालेली नाही.
----------------------------------
वाहतूक नियमनासाठीचे मनुष्यबळ
पोलिस अधिकारी - ६२
कर्मचारी - ७००
बीट मार्शल - २२
नादुरुस्त वाहनांसाठी - ११ क्रेन
वाहन दुरुस्ती कर्मचारी - १४
--------------------------------------
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे व्हावा, यासाठी नवी मुंबई पोलिस दलामार्फत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
वाहतुकीवर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून, पर्यायी मार्गसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक, नवी मुंबई
-------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.