मुंबई

पालघरमधील मतदारसंख्येत एक लाखाने वाढ

CD

सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २३ ः पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. विधानसभेनंतर आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त मतदार जिल्ह्यात वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची मतदार संख्या २४ लाखांच्या जवळपास आली आहे. सर्वाधिक मतदार संख्या नालासोपारा, बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये वाढत आहे. नालासोपारामध्ये ४८ हजार, तर बोईसर विधानसभेमध्ये २६ हजारांची मतदार वाढ आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पालघर लोकसभा क्षेत्रात दररोज सरासरी ३८९ मतदारांची वाढ होत असून नालासोपारा येथे दररोज सरासरी १७६, तर बोईसर येथे ९६ मतदार वाढत आहेत.

मतदार संख्या व यादी निश्चितीकरण प्रक्रिया मेव्यतिरिक्त जानेवारी आणि जुलैमध्ये झाली नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणती मतदार संख्या व यादी ग्राह्य धरली जाणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर लोकसभेअंतर्गत २२ लाख ९२ हजार मतदारांची नोंद होती. २२ मे ला मतदार संख्या २३ लाख ७९ हजार आणि २६ मे ला मतदारसंख्या २२ लाख ८४ हजार होती. त्यानंतर जुलैमध्ये ही मतदारसंख्या निश्चित केली नव्हती. त्यातच १ ऑगस्टला मतदारसंख्या २३ लाख ९६ हजारावर आली. अर्थात मतदारसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मेपर्यंत जिल्ह्यात मतदारसंख्या तब्बल ९२ हजाराने वाढले. वसई विधानसभा क्षेत्रात ८,८६५, डहाणू क्षेत्रात ८,८०९, पालघर क्षेत्रात ६,२४३, तर विक्रमगड क्षेत्रात ५,६१३ मतदार वाढले आहेत.


ऑगस्टमधील मतदार संख्येचा तक्ता
विधानसभा पुरुष महिला तृतीयपंथी एकूण
डहाणू १,५३,६५० १,५६,३६६ ३२ ३,१०,०४८
विक्रमगड १,६०,६२२ १,६२,७३१ १ ३,२३,३५४
पालघर १,५१,८५० १,५२,९५० २२ ३,०४,८२२
बोईसर २,३५,५२९ २,०२,०६१ ४२ ४,३७,६३२
नालासोपारा ३,४९,१८७ ३,०७,३६८ १३० ६,५६,६८५
वसई १,८५,९९४ १,७७,५११ १२ ३,६३,५१७
एकूण १२,३६,८३२ ११,५८,९८७ २३९ २३,९६,०५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT