मिस्टर इंडिया २०२५चे तिन्ही विजेते जाहीर
मुंबई, ता. २४ ः विव्झ फॅशन स्कूलच्या सहकार्याने मुंबईत ‘मिस्टर इंडिया २०२५’ पर्व-दोनच्या अंतिम फेरीचे विजेत्यांची घोषणा झाली. शेवम सिंग, अबेल बिजू आणि शिव चोरडिया अशी विजेत्यांची नावे असून, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पटनाहून आलेल्या शेवम सिंगने साधेपणातून यशाकडे वाटचाल करत मिस्टर वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. केरळमधील अबेल बिजू यांना त्यांची संवेदनशीलता आणि दृढता यामुळे पोलंडमधील सुपरनॅशनलचे तिकीट मिळाले, तर पुण्याच्या शिव चोरडियाची अष्टपैलू प्रतिभा आणि समाजसेवेची उमेद रायझिंग स्टार ठरली. यंदाच्या वर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणजे मिस्टर वर्ल्ड २०१६ रोहित खंडेलवाल अधिकृत मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले होते. या सोहळ्यात अनू मलिक, विंदू दारा सिंग, अदिती गोवित्रीकर यांच्यासह फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर आणि उद्योग जगतातील दिग्गज उपस्थित होते. पूजा भामराह यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सोहळ्याचे दिग्दर्शन प्रसाद बिदापा यांनी केले. मानसी स्कॉट यांच्या आकर्षक सादरीकरणाने या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर अंतिम फेरीतील स्पर्धकांनी प्रसिद्ध डिझायनर वरोइन मारवाह यांच्या उत्कृष्ट निर्मितीसह रॅम्पवर सादरीकरण केले. ज्युरी पॅनेलमध्ये संगीता बिजलानी, अदिती गोवित्रीकर, केन घोष, रॉकी स्टार, जतिन कंपानी आणि वरोइन मारवाह यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.