मुंबई

पर्यावरणपूरकतेच्या रंगात रंगणार गणेशोत्सव

CD

वसई, ता. २४ (बातमीदार) : गणरायाच्या आगमनाला अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे घरोघरी गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत सुरू आहे. गणरायाच्या मखराची सजावट, रोषणाई यासोबतच प्राणप्रतिष्ठा आणि त्यानंतरच्या नियमित पूजेसाठी साहित्य खरेदीची लगबग वाढली आहे. मुसळधार पावसामुळे काही दिवस बाजारपेठ बंद होती. त्यामुळे खरेदी मंदावली होती, मात्र पावसाने विश्रांती घेतल्यावर नागरिकांची पावले खरेदीकडे वळली आहेत. आज (ता. २४) सुट्टीचा दिवस असल्याने बाजारपेठेत चांगली गर्दी दिसून आली. कलात्मक सजावटीचे साहित्य, पूजेचे सामान व आवश्यक अशा वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा उत्सवाला पर्यावरणाचे रंग भरले जात असल्याने उत्सव समाजात आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे.

गणेशोत्सवाची तयारी करताना सार्वजनिक मंडळ, घरगुती प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू झाली आहे. उत्सवाला पर्यावरणाचा रंग देण्यासाठी लाकूड, कपडा, माती, नैसर्गिक रंग, पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू पालघर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहेत. गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर दोन दिवस साप्ताहिक सुट्टी आल्याने शनिवारी (ता. २३) सकाळपासूनच प्रमुख व्यापारी गल्लीबोळात विविध साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह होता. कापडी मखर, आकर्षक फुलांचे कृत्रिम तोरण, कंठी, पडदे, रोषणाई, विविध रंगबेरंगी कागद यासह ग्राहकांच्या मागणीनुसार कृत्रिम फुलेदेखील विक्रीसाठी आली आहेत. यात बॅक ड्रॉप हे मुख्य आकर्षण ठरत आहे. गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी मागील बाजूला रंगीत, चंदेरी, सोनेरी असा साज बॅक ड्रॉपमुळे येत असल्याने ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

शाडूच्या मातीचा वापर आणि नैसर्गिक रंग वापरलेल्या मूर्तींकडे गणेशभक्तांचा कल दिसून येत आहे. गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक मूर्तीची नोंदणी केली आहे, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. तसेच विसर्जनासाठी कृत्रिम तलावदेखील उभारले जाणार असल्याने जलप्रदूषण रोखण्यास यश येणार आहे.

शृंगार ओटीला पसंती
गणरायांच्या आगमनापूर्वी हरतालिका व्रत केले जाते. त्यासाठी हरतालिकेच्या मूर्ती, ओटीचे साहित्य, पान, विडा, सुपाऱ्या, गजरे यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. सुमारे ३० ते ४० रुपयांपर्यंत या मूर्ती मिळतात. देवीच्या लहान वेण्या, मूर्तींच्या आकाराचे लहान हार यांनीही महिलांना आकर्षित केले आहे. ओटीचे साहित्य एकाच पाकिटात मिळत असल्याने ते सोईचे ठरते. त्यात शृंगार ओटीला सध्या अधिक मागणी असल्याने महिलांचा शृंगार ओटी खरेदीकडे कल वाढला आहे.

खरेदीला महागाईची झळ
महागाईची झळ पूजा सामग्रीलाही बसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पूजा साहित्याच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. तसेच गोल्ड प्लेटेड दिवे, रंगीत माळा, गणपती-गौरींचे मुकुट, आरतीचे तबक अशा डिझायनर वस्तूंच्या किमतीत ४५ ते ५० टक्के वाढ झाली आहे. असे असूनही महाग साहित्य खरेदी करण्याकडेच भाविकांचा कल आहे.

गणेशोत्सवासाठी सजावट साहित्य उपलब्ध आहे. यात विविधरंगी तोरण, सुटी फुले, वेलवेट कपडा, मॅट यासह अन्य पर्यावरणपूरक साहित्याला गणेशभक्तांची पसंती आहे. वसई-विरार शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी येत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी भाव वाढले आहेत.
- गणेश पांडे, विक्रेते

गणेश चतुर्थीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. सध्या कापडी मखर, कृत्रिम फुले आणि पूजेचे सामान वसईत एकाच ठिकाणी मिळत असल्याने खरेदी करणे सोईचे झाले आहे.
- श्वेता मसुरकर, ग्राहक, वसई

सजावटीच्या साहित्याचे दर
साहित्य दर
तोरण १५० ते ६००
१० फूट वेलवेट कापड १,५००
लटकन तोरण ३५० रुपये जोडी
फुले ४० ते ६० रुपये डझन
बॅक ड्रॉप (एक चौरस फूट) १२०
घंटी लहरी (जोडी ) १००
फ्लॉवर मॅट १००
कापडी मखर रोषणाई ४,०००
कापडी डिझाईन व रोषणाई मखर ६,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT