मुंबई

आमदार मंदा म्हात्रेंचा पुत्र आणि सुन निवडणूकीच्या रिंगणात

CD

म्हात्रेंची दुसरी पिढी मैदानात
सीबीडी बेलापूरमधून निवडणूक लढणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ ः बेलापूर मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून आलेल्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची दुसरी पिढी तब्बल २० वर्षांनी पुन्हा राजकारणात उतरत आहे. म्हात्रे यांचा पुत्र नीलेश म्हात्रे दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकीला सामोरा जाणार आहे, तर नमिता म्हात्रे बेलापूर गावातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
भाजपचे महामंत्री असलेले नीलेश म्हात्रे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून भाजपमध्ये कार्यरत आहेत. मंदा म्हात्रे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना २००० मध्ये नीलेश सीबीडी येथून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते, परंतु २००५ मध्ये डॉ. जयाजी नाथ यांचा राष्ट्रवादीकडून अचानक अर्ज आल्याने म्हात्रे यांचा अर्ज बाद झाला होता. तेव्हापासून गेली २० वर्षे नीलेश यांनी प्रत्यक्ष राजकारणाऐवजी आईसोबत समाजकार्य करण्यावर भर दिला. बेलापूर मतदारसंघातील विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी तरुणांसोबत त्यांनी अनेक आंदोलने केली. तसेच विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती. पक्षांतर्गत कार्यकर्ते व मोर्चेबांधणी करून संघटनेला बळ देण्याचे काम केले.
----------------------------
जनसेवेचा ध्यास
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नीलेश यांना निवडणुकीच्या रिंगणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून त्यांच्या नावाची कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार म्हणून ओरड सुरू आहे. त्यांच्या मागे कार्यकर्ते, सीबीडी-बेलापूरकरांचा जनाधार आहे.
- पदवीधर असलेल्या नमिता म्हात्रे गेली २८ वर्षे विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असतात. हळदी-कुंकू, मंगळागौर, लग्नकार्ये, वाढदिवसांच्या माध्यमातून सक्रिय आहेत. महिलांना देवदर्शन घडवून आणणे अथवा आरोग्य शिबिरांमध्ये त्यांची धावपळ असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Shashikant Shinde: प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय: आमदार शशिकांत शिंदे; सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी जागरूक राहावे

Satara Teachers Bank: 'सातारा शिक्षक बॅंकेची १५ मिनिटांत गुंडाळली वार्षिक सभा'; गैरकारभार, नोकर भरती आदी मुद्द्यांवरून घोषणाबाजी

चेतेश्वर पुजाराची काल निवृत्ती अन् आज दुसऱ्या खेळाडूने माफी मागून मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; देशासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज...

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

Online Gaming Bill 2025: Asia Cup पूर्वीच ड्रीम 11ची माघार; बीसीसीआयला किती कोटींचे नुकसान होणार?

SCROLL FOR NEXT