भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि अपहार करणाऱ्या फरार आरोपीला उत्तर प्रदेश एटीएस पथकाने भिवंडी येथील एका हॉटेलवर रविवारी (ता. २४) छापा टाकून अटक केली. आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल सहा कोटी ४० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
एटीएसच्या माहितीनुसार, अटक झालेला आरोपी सुधीर केसरवानी हा प्रयागराज जिल्ह्यातील मुठीगंजचा रहिवासी असून, तो २०१६ पासून संगम कन्स्ट्रक्शन कंपनीत एजंट म्हणून काम करत होता. त्याने भागीदार नीरज जयस्वालसोबत संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. त्यातील केवळ ७५ लाख रुपये कंपनीला परत करून उर्वरित रक्कम बळकावली. याप्रकरणी अल्लाहपूर येथील शैलेंद्र रणवीर सिंग यांनी जॉर्ज टाऊन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. अटकेपासून बचाव करण्यासाठी केसरवानी भिवंडीत लपून बसला होता. प्रकरण हायप्रोफाइल असल्याने तपास प्रयागराज पोलिसांकडून एसटीएफकडे सोपवण्यात आला. आरोपी भिवंडीत असल्याची खात्री होताच एटीएस पथकाने कल्याण रोडवरील गोपालनगर परिसरातील उत्सव हॉटेलवर छापा टाकून त्याला अटक केली. आरोपीवर आधीच सहा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यात किडगंज पोलिस ठाण्यात दोन, मुठीगंज औद्योगिक क्षेत्रात दोन, कोरांवमध्ये एक आणि जॉर्ज टाऊनमध्ये एक असा समावेश आहे. या कारवाईत एसटीएफ फील्ड युनिट, प्रयागराजचे पोलिस उपअधीक्षक शैलेश प्रताप सिंह आणि निरीक्षक जय प्रकाश राय यांच्या नेतृत्वाखालील पथक सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.