तळोजावासी नागरी समस्येमुळे त्रस्त
उत्सवाच्या तोंडावर उपाययोजना करण्याची मागणी
खारघर, ता. २५ (बातमीदार) ः तळोजा वसाहतीतील रहिवासी ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर खड्डेमय रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, निवारा शेड नसणे, वेळेवर बसेस न धावणे आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे त्रस्त झाले आहेत. सध्या मुसळधार पावसामुळे धरण ओसंडून वाहत असून, नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे रहिवासीयांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची मागणी जोर धरत आहे.
तळोजा वसाहतीची लोकसंख्या सध्या लाखांवर पोहोचली असून, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पालिका आणि सिडको प्रशासनाने परिसरातील समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे, मात्र फेज एक आणि दोनमधील रस्त्यांची दुरुस्ती अद्याप सुरू झालेली नाही. रस्त्यावर वाहने उभी असल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत आहे, तर सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पथदिव्यांची अनेक ठिकाणी खराब स्थिती, फेरीवाल्यांचे पदपथावर अतिक्रमण, तसेच दुकानदारांकडून मार्जिनल स्पेसवर कब्जा, हे देखील रहिवाशांच्या तक्रारींचा मुख्य भाग आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता येत नाही, कर्मचारीवर्गाला कामावर जाताना विलंब होतो आणि वृद्ध-महिलांसाठी प्रवास धोकादायक ठरतो. आग किंवा इतर आपत्ती घडल्यास अग्निशमन दलाच्या प्रतीक्षेत राहावे लागते, तसेच भुयारी मार्गात पाणी भरल्यास तीन किलोमीटर अंतर पार करून वसाहतीत प्रवेश करावा लागतो. शिवसेना व तळोजा कॉलनी फेडरेशनसह सामाजिक कार्यकर्ते यांनी पालिका व सिडको प्रशासनाला निवेदनाद्वारे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले की, तळोजा वसाहतीसाठी एमआयडीसी मार्गे पाणीपुरवठा केला जातो. शटडाऊनमुळे समस्या निर्माण झाल्यास खारघरमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तसेच पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.