मुंबई

गांजा तस्करीप्रकरणी १३ आरोपींना अटक

CD

गांजा तस्करीप्रकरणी १३ आरोपींना अटक
७० लाखांचा माल जप्त

कल्याण, ता. २५ (बातमीदार) : कल्याण पोलिसांनी शहरात येणाऱ्या गांजाच्या मोठ्या तस्करीचा छडा लावला आहे. या कारवाईत एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ११५ किलो गांजा, पिस्टल, काडतुसे, वॉकीटॉकी व काही वाहने असा एकूण ७० लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा करणारी साखळी पोलिसांनी उलगडली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बदलापूर, ठाणे, सोलापूर, विशाखापट्टणम येथे जाऊन आरोपींना मुद्देमालासह जेरबंद केले. आंध्र प्रदेशमधील आरोपी जंगल भागात एकमेकांशी संपर्क करण्यासाठी वॉकीटॉकी वापरीत असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून संपूर्ण संच व अग्निशस्त्रे हस्तगत केली आहेत. बाबर उस्मान शेख (वय २७), गुफरान हनान शेख (२९), सुनील मोहन राठोड (२५), आझाद अब्दुल शेख (५५), रेश्मा अल्लाउद्दीन शेख, शुभम ऊर्फ सोन्या शरद भंडारी (२६), सोनू हबीब सय्यद (२४), आसिफ अहमद अब्दुल शेख (२५), प्रथमेश हरिदास नलवडे (२३), रितेश पांडुरंग गायकवाड (२१), अंबादास नवनाथ खामकर (२५), आकाश बाळू भिताडे (२२), योगेश दत्तात्रय जोध (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया करणार असल्याचे अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT