मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

शिपुरकर आणि वाघरे शाळेत विद्यार्थ्यांनी घडविले चिमुकल्या हातांनी गणपती बाप्पा
माणगाव (वार्ताहर) : माणगाव येथील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळविणाऱ्या सुधाकर नारायण शिपुरकर आणि गणेश यशवंत वाघरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या हातांनी वैविध्यपूर्ण कला सादर करून बुद्धी आणि कलेची देवता गणेश मुर्ती घडवून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार करताना हे चिमुकले रंगून गेले होते. त्यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक छोट्या व मध्यम आकाराच्या गणेश मूर्ती करून आपली शिल्प कला सादर केली. श्री गणेश उत्सवापूर्वी या शाळेतील विद्यार्थी गणेश मूर्ती बनवण्यात मग्न झाले होते. काहींनी शाडू माती, कुणी क्लेची माती, कुणी शेतातील माती तर काहींनी टाकाऊ कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती साकारल्या. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करत मनातील लोभस आणि गोंडस रूप प्रकट करून सादर केले. कोणत्याही प्रकारचा अनुभव नसतानाही लहान विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गणपती बाप्पा मोरया म्हणत गणेश मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. चिमुकल्या हातांनी एकेक गणपतीचा अवयव तयार करताना प्रत्येकाच्या निर्विकार चेहऱ्यावर जिद्द आणि चिकाटी दिसत होती.
............
रोहा शहरात अत्याधुनिक नाट्यगृहाचे काम वेगाने
रोहा (बातमीदार) : मुंबई-पुणेच्या धर्तीवर रोहा येथे अत्याधुनिक नाट्यगृहाचे काम सुरू आहे. खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच पाहणी केली. फेब्रुवारी २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. लवकरच नाट्य, संगीत, नृत्य आणि वाद्यवृंदासाठी हे सभागृह खुले होणार आहे. या वेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
.................
कर्जत भात संशोधनामुळे अन्नसुरक्षेला बळकटी : कुलगुरू
कर्जत (बातमीदार) : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात जागतिक दर्जाच्या सुविधा उभारल्या जात असून त्यामुळे देशाच्या अन्नसुरक्षेला बळ मिळेल, असे मत कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी व्यक्त केले. येथील संशोधन केंद्राच्या विविध प्रक्षेत्रावर भेट देऊन प्रयोगांची पाहणी केल्यावर शास्त्रज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते. संशोधन केंद्राच्या भात पैदास विभाग, कृषीविद्या विभाग व एम. ए. ई. प्रक्षेत्रावरील सर्व प्रयोगांना भेट देत पीक परिस्थिती, संशोधनाचा दर्जा व उपयुक्तता याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करीत सर्वच शास्त्रज्ञ उत्तमरीत्या काम करीत असल्याचा निर्वाळा देत त्यांचे अभिनंदन केले. गतिमान पैदास तंत्रज्ञानामुळे नवीन भात वाण संशोधनाचा कालावधी १३-१४ वर्षांवरून ६-७ वर्षापर्यंत कमी होईल. शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप बारीक, जाड, विविध गुणवैशिष्ट्ये असलेल्या हळव्या, निमगरव्या, गरव्या, अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या, रोग व किडींना प्रतिकारक, बदलत्या वातावरणातही तग धरणाऱ्या, सुधारित व संकरित भात जाती संशोधित करणे सोपे जाईल. कमी खर्चिक लागवड पद्धतींची शिफारसही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुनावेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल,असे ते म्हणाले.
...............
आरडीसीएची जिल्हास्तरीय पंच परीक्षा उत्‍साहात
पोयनाड (बातमीदार) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पेण येथे जिल्हास्तरीय पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले. ३० पंचांनी सहभाग घेतला. मागील ७५ दिवसांपासून आभासी व प्रत्यक्ष कार्यशाळेत मार्गदर्शन झाले होते. बीसीसीआयचे पंच हर्षद रावले, एमसीएचे पंच राजन कसबे यांनी प्रशिक्षण दिले. परीक्षेत लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रकारांचा समावेश होता. पंच व गुणलेखक घडविण्यासाठी आरडीसीएचे प्रयत्न सुरू आहेत.
........
गौरी गणपतीत महिलांचा पारंपरिक नाच
तळा (बामतीदार) : गौरी गणपतीनिमित्त महिलांनी पारंपरिक नाचाचा फेरा सादर केला. एकरंगी साड्यांमध्ये सजलेल्या महिलांनी एकसुरात गाणी गात ताल धरला. ढोलकीच्या गजरात गणरायाच्या गाण्यांसह राजाच्या कहाण्या, चवळीची गाणी गात जुन्या परंपरा जिवंत ठेवल्या. या भोवऱ्यांनी सणाला उत्साहाचे आणि सांस्कृतिक वातावरण लाभले.
...............
गणेशोत्सवासाठी पोलादपूर नगरपंचायतीची तयारी पूर्ण
पोलादपूर (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम, विसर्जन घाट स्वच्छता, पथदिवे दुरुस्ती, खड्डे बुजवणे आदी कामे करण्यात आली. नगराध्यक्षा स्वतः प्रभागनिहाय पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित वातावरण देणे आमचे प्राधान्य, असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षा शिल्पा देवेंद्र दरेकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष व कर्मचारी यांना प्रत्येक प्रभागात भेटी देत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, नगरपंचायतच्या वतीने नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रकाशमय वातावरण मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्या म्हणाल्या व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याधिकारी विनय शिपाई, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, नगरसेवक विनायक दीक्षित, इंजिनीयर निशांत ओसरमल आदी उपस्थित होते.
...................
पेण बाजारात गणेशोत्सवी गर्दी; पावसाने हिरमोड
पेण (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पेणच्या बाजारात भाविकांची गर्दी होत आहे. पूजेचे साहित्य, मखर, फुले, कपडे, मिठाई यांची खरेदी सुरू असताना मुसळधार पावसामुळे भक्तांचा हिरमोड झाला. पेण हे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असून कोट्यवधींची उलाढाल येथे होते. मात्र पावसामुळे खरेदीत अडथळे निर्माण झाले आहेत. गणेशोत्‍सवानिमित्त बाजारपेठमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार सुरूवात केल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT