गणेशोत्सव लाखोंची उलाढाल
इकोफ्रेंडली मखर, स्वदेशी वस्तूंना मागणी
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) ः गणेशोत्सव काळात दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली आहेत.
रंगीत कागद, तयार मखर, विद्युत रोषणाईच्या माळा, प्लॅस्टिकचे हार, फुलदाणींची रेलचेल आहे. वस्तूंच्या किमती काहीशा वाढल्या आहेत. वस्तूंमध्ये यंदा नावीन्य दिसून येत आहे. हार, मखर, फुले, फुलदाणी, कुंड्यांना सर्वाधिक मागणी आहे. मखरांच्या किमतींतही यंदा वाढ दिसून येते. थर्माकोलऐवजी या वेळी अनेक कारागिरांनी एमडीएफ आणि फायबरपासून मखरे बनवली आहेत. ही मखरे कायमस्वरूपी टिकणारी असून, त्यांच्या किमती १,२०० रुपयांपासून ते ५,००० रुपयांपर्यंत आहेत. थर्माकोलला पर्याय म्हणून यंदा फोम शीटची मागणी वाढली आहे. फोम शीट महाग असल्यामुळे ग्राहकांकडून कार्ड शीट, गोल्डन पेपर, वेलवेट पेपरची खरेदी केली जात आहे.
..................
चौकट :
सिंगल, मल्टिकलर फ्रेड लाइट्सला मागणी
विद्युत रोषणाईमध्ये यंदा भारतीय बनावटीचे एलईडी, १० ते १०० वॉटच्या सिंगल, मल्टिकलर फ्रेड लाइट्स, झालर यासारखे प्रकार उपलब्ध आहेत. सर्वाधिक पसंती एलईडी बल्बच्या माळांना मिळत आहे. यासह रोबलाइट्स, लेझर लाइट्स, पारलाइट्स, रोटरेटिंग लॅम्प, चक्र, एलईडी फोकस, एलईडी स्ट्रीप सेट, फळे, फुले व पानांची तोरणे, छोटी-मोठी झाडे बाजारात उपलब्ध आहेत. याच्या किमती ८० रुपयांपासून ते पाच-दहा हजार रुपयांपर्यंत आहेत.
..............
चौकट :
स्वदेशी वस्तूंना मागणी
यंदा स्वदेशी वस्तूंची खरेदी सुरू आहे तसेच चिनी वस्तूंना कमी मागणी आहे. चंदनहार, मोत्यांच्या माळा आणि लटकनची आराससाठी विक्री होत आहे. यामध्ये गोल मण्यांची माळ, मोत्यांची माळ, चंदनहार, कापडी व कागदी फुलांच्या माळा तसेच लटकनदेखील उपलब्ध आहेत. यामध्ये चंदनहार ७० ते ८०० रुपये, कापडी माळ ३०० ते १,२०० रुपये, गोंद्याची माळ २०० ते १,५०० रुपये, मोत्यांचा हार २०० ते १,००० रुपये असे दर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.