मुंबई

बचत गटांच्या मोदकांचा ठाणे, मुंबईपर्यंत प्रवास

CD

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २६ : बाप्पाच्या नैवेद्यात मोदकाला प्रथम स्थान असते. त्यामुळे उत्सवादरम्यान मोदक, लाडूची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. महापालिकेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून मोदक विक्रीतून रोजगार मिळत आहे. वसई-विरार शहरातील मोदक मुंबई, ठाणे असा प्रवास करत बाप्पाच्या चरणी जात आहेत.

वसई-विरार महापालिकेकडून शेकडोच्या संख्येने महिला बचत गटांची स्थापना केली आहे. या बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, मार्गदर्शन, तसेच व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे अनेक महिला उद्योजकतेकडे वाटचाल करू लागल्या असून स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. दिवाळी, नवरात्र, पाडवा, गणेशोत्सव, नाताळ यासह अन्य सणासुदीच्या वेळी महिलांकडून विविध वस्तू तयार केल्या जातात. विक्रीसाठी पालिका बाजारपेठदेखील उपलब्ध करून दिली जाते.

सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना खाद्यपदार्थ तयार करण्यात महिला व्यग्र झाल्या आहेत. मोदक, बेसन, रवा व मुगाचे लाडू, करंज्या तयार केल्या जात आहेत. मोदकाला विविध चव देण्यात आली आहेत. ज्यात चॉकलेट, पिस्ता मावा, स्ट्रॉबेरी, मँगो, रसमलाई, फ्रुट ॲण्ड नट आदींचा समावेश आहे. बाजारातून चांगल्या प्रतीचे साहित्य आणून महिला मोदक तयार करत असल्याने त्यांची चव आगळीच असल्याने मागणी वाढू लागली आहे.

घरी आनंदाच्या वातावरणात घरगुती खाद्यपदार्थांची चव, गोडवा चाखता यावा, म्हणून अनेक घरांतून, सार्वजनिक मंडळांच्या माेदकांना मागणी येत असल्याने त्यांना रोजगारातून अर्थार्जनाचा मार्ग उपलब्ध झाल्याने सुखकर्ता धावून आल्याचे समाधान मिळत आहे.

स्ट्रॉबेरी, कोकोनट, पिस्ता मावा, फ्रुट अँड नट, चॉकलेट मोदक १००० रुपये किलो
प्रतिनग मोदक २० ते ३० रुपये
रसमलाई १२०० रुपये किलो

महापालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजनेच्या शहर व्यवस्थापिका रुपाली कदम व प्रशासन महिलांच्या नेहमी पाठीशी उभे राहत असल्याने आम्हाला स्वयंरोजगाराचे दालन प्राप्त झाले आहे. घरगुती खाद्यपदार्थ सर्व दूर जावे, यासाठी प्रयत्न असतो. बचत गटाने यंदा मोदक, लाडू, करंज्या तयार केल्या असून चांगला प्रतिसाद मिळतो.
- रुचिता राजेश विश्वासराव, श्रम समृद्धी महिला बचत, नालासोपारा

महापालिकेच्या माध्यमातून बचत गटांना प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळते. आमच्या महिला बचत गटातील महिला विविध पर्यावरणपूरक, तसेच सणासुदीला लागणाऱ्या वस्तू तयार करतात. गणेशोत्सवाला देखील मोदकापासून ते कृत्रिम फुले तयार केली आहेत.
- गीता आयरे, मा एनजीओ महिला बचत गट

गणेशोत्सवासाठी घरगुती मोदक तयार करत आहोत. आतापर्यंत एकूण ४५ ते ५० किलोची मागणी पूर्ण झाली आहे. चर्चगेट, ठाणे, डोंबिवली, अंधेरीपर्यंत मोदक पाठवण्यात आले आहेत. छोटे व मोठे पॅकेट ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महिलांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. अनेक सणासुदीला लागणारे साहित्य बनवून त्याची माफक दरात विक्री करतो.
- लीना डिक्रूज, मोदक विक्रेत्या, वसई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT