मुंबई

विदर्भातील चार कलाकारांची रंगाची उधळण

CD

विदर्भातील चार कलाकारांची रंगांची उधळण
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन

मुंबई, ता. २८ : मुंबईतून कलेचे शिक्षण घेऊन कलेच्या सेवेसाठी विदर्भात परतलेल्या चार कलाकारांची चित्रे मुंबईकरांना आकर्षित करीत आहेत. भारतीय प्राचीन संस्कृती, मानवी भावना, निसर्गातील विविध प्रकारचे गुण आणि भारतीय कलावैभवाच्या अमूर्ततेचा शोध घेणाऱ्या विदर्भातील या चित्रकारांचे जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रप्रदर्शन सुरू झाले आहे. जे. जे. कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, प्रा. सुरेंद्र जगताप, प्रा. प्रतिभा वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या चित्रप्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले.

विदर्भाच्या मातीमध्ये विविध संस्कृती आणि कलेचा आविष्कार साधणाऱ्या, ती कला आपल्या कुंचल्यातून कॅनव्हासवर साकारणाऱ्या चार चित्रकारांचे हे चित्रप्रदर्शन आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल तायवाडे, चंद्रशेखर उमरेकर, मृण्मयी बोबडे, गजानन बोबडे यांनी रेखाटलेल्या काही महत्त्वाच्या चित्रकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. पेशाने प्राध्यापक असलेल्या प्रफुल्ल तायवाडे यांचे जहाँगीर आर्ट गॅलरीतील हे तिसरे प्रदर्शन आहे. त्यांनी निसर्गातील विविध पद्धतीचे गुण, त्यातील लयबद्धता आपल्या कॅनव्हासवर जिवंतपणे रेखाटली आहे. ही निसर्ग चित्रकला रसिकांना भावली तर व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या चंद्रशेखर उमरेकर यांच्या चित्रांतून मानवी भावना नातेसंबंध आणि जीवनातील विविध पैलू रंगरेषांतून उलगडत जातात. त्यांची चित्र पाहताना रसिक आपल्या मनातील विविध भावना व्यक्त करताना दिसतात.

मृण्मयी बोबडे यांच्या चित्रांवर भारतीय पारंपरिक चित्रशैलीची छाप दिसते. त्यांच्या चित्रांतून राजस्थानी आणि मध्ययुगीन काळातील, प्रामुख्याने महिला, त्यांचा शृंगार आणि स्त्रियांचे भावविश्व उलगडते. गजानन बोबडे यांची चित्रं अमूर्ततेचा शोध घेतात. त्यांची चित्रे विचार करायला भाग पाडणारी आहेत.

निसर्गातील विविध आर्ट फॉर्म मला कायम आकर्षित करीत आले आहेत. या वेळीदेखील निसर्गाचे विविध घटक घेऊन मी चित्रं रेखाटली आहेत.
प्रफुल्ल तायवाडे, चित्रकार
...
व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चित्र काढणारे हे कलाकार नाहीत. त्यामुळे त्यांची चित्रं खऱ्या अर्थाने मानवी मनाला भावणारी आहेत.
- डॉ. किशोर इंगळे, संचालक, जे. जे. कला संचालनालय
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकलं; मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानात धडाडणार

Weather Update : गोवा, कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय; मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत 'हवामान'ची स्थिती कशी?

Mahabaleshwar News:'वेण्णा लेकनजीक आढळले अजगर'; भक्ष्याच्या शोधार्थ वावर; वन विभाग, सह्याद्री प्रोटेक्टर्समार्फत रेस्क्यू

Pasta Manchurian Recipe: टिफिनसाठी सकाळी घरच्या घरी बनवा मंचूरियन पास्ता, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज आझाद मैदानात धडकणार; मुंबईतील व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT