मुंबई

भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण येणार

CD

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता, तर पशुप्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात पशुप्रेमी संस्था, महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्राण्यांच्या सुरक्षिततेसोबतच नागरिकांच्या सुरक्षेची हमी मिळावी, यासाठी ठोस उपाययोजनांचा आराखडा तयार केला.
शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता ठोस तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. बैठकीत भविष्य फाउंडेशन या पशुप्रेमी संस्थेचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि आमदार कुमार आयलानी सहभागी झाले होते. कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी व्यापक नसबंदी मोहीम, पशुवैद्यकांची संख्या वाढवणे, विद्यमान नसबंदी केंद्रातील त्रुटी दूर करणे, शहरात कुत्र्यांची अचूक गणना करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फाउंडेशनने या सर्वेक्षणासाठी महापालिकेला सक्रिय मदत करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत आतापर्यंत झालेल्या नसबंदीची आकडेवारी, सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती आणि एका मोठ्या जागेचे नियोजनाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे आगामी काळात योग्य पद्धतीने कुत्र्यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, डॉ. उत्कर्षा शिंदे, फाउंडेशनचे ॲड. हिना कुकरेजा, ॲड. सृष्टी चुग, पुष्पा पिल्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लसीकरण मोहिमा राबवणार
बैठकीदरम्यान उपायुक्त स्नेहा करपे यांनी सांगितले, लवकरच भटक्या कुत्र्यांच्या लसीकरण मोहिमा राबवून त्यांच्या योग्य देखभालीसाठी ठोस निर्णय घेतले जातील. नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांची आरोग्यसंवर्धन ही दोन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी पार पाडण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईत धडकलं; मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानात धडाडणार

Weather Update : गोवा, कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय; मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत 'हवामान'ची स्थिती कशी?

Mahabaleshwar News:'वेण्णा लेकनजीक आढळले अजगर'; भक्ष्याच्या शोधार्थ वावर; वन विभाग, सह्याद्री प्रोटेक्टर्समार्फत रेस्क्यू

Pasta Manchurian Recipe: टिफिनसाठी सकाळी घरच्या घरी बनवा मंचूरियन पास्ता, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज आझाद मैदानात धडकणार; मुंबईतील व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT