मुंबई

कोवळ्या जिवावर मायेची छत्रछाया

CD

खारघर, ता. ३१ (बातमीदार) : खारघर डोंगरावर सोडून दिलेल्या चार वर्षांच्या बालिकेवर कोवळ्या वयातच संकटांचा डोंगर कोसळला होता; पण फणसवाडीतील हिरा आणि चांगुणा मधे तिच्या मदतीला धावून आले. या मुलीचा दोघांनी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला आहे.
निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक कुटुंब, पर्यटक डोंगरावर येतात. अठरा वर्षांपूर्वी निसर्गरम्य वातावरण, चोहीकडे हिरवळ पसरलेल्या खारघर डोंगरावर अंदाजे चार वर्षीय बालिकेच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. तरळत्या डोळ्यांनी आई-बाबांना आवाज देत शोध घेत असताना हिरा मधे यांना सापडली होती. मुलीला धीर देताना मधे यांनी दऱ्या, डोंगरात मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेतला; मात्र कोणीही नजरेस पडले नसल्यामुळे अखेर तिला घरी घेऊन पत्नी चांगुणाच्या ताब्यात दिले. घडलेला सगळा प्रकार समजल्यानंतर चांगुणा मधे यांनीदेखील बालिकेला कुरवाळत जवळ घेतले. प्रेमाने तिच्या पाठ आणि डोक्यावर हात फिरवत तुझे आई-बाबा लवकरच येतील, असा धीर दिला. डोंगरावर निसर्गाचा आनंद घेताना चुकामूक झाली असेल, अथवा रागाच्या भरात असे कृत्य केले असेल, असे अंदाज त्यांनी व्यक्त केला. हिरा यांनी ही घटना जवळच्या पाड्यात तसेच ओळखीच्या व्यक्तींना सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, एक मुलगा आणि दोन मुली असताना सापडलेली चिमुकली मधे कुटुंबातील एक सदस्य झाली होती.
----------------------------------
समाजासमोर आदर्श
- मधे कुटुंबीयांनी मुलीचे नाव सोनू ठेवले. हळूहळू ती घरातील मुलांबरोबर खेळूबागडू लागली. कुटुंबात समरस झाली. पाड्यातील प्राथमिक शाळेत स्वतःच्या मुलांबरोबर तिलाही शाळेत दाखल केले. माध्यमिक शिक्षणानंतर तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले.
- मुंबईसारख्या शहरात वाढती महागाई, त्यात हाताला काम नसल्याने कुटुंबाची तारांबळ होते; मात्र हातावर पोट असलेल्या हिरा मधे आणि चांगुणा यांनी मात्र एका हरवलेल्या मुलीचे पालनपोषण करून समाजासमोर अनोखा आदर्श ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Law Reforms: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! आता 'या' गुन्ह्यांसाठी तुरुंगवास होणार नाही, रद्द केलेले १३ नियम कोणते?

आजोबा राज्यपाल आणि गर्भश्रीमंत घराणं ! अभिनयासाठी घरातून पळाला पण कामामुळे खाल्ला बायकांकडून चपलांचा मार

IND vs AUS 1st T20I : पावसाने वाट लावली, षटकांची संख्या कमी झाली! जाणून घ्या मॅच पुन्हा किती वाजता सुरू होणार

नगराध्यक्षपदासाठी जयंत पाटलांचा महत्त्वाचा निर्णय; 'या' नेत्याला उतरवलं मैदानात, जगात सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला दिलं खुलं आव्हान

IND vs AUS 1st T20I : एवढा लाड! Harshit Rana वरून नेटिझन्सनी गौतम गंभीरला झोडले; फलंदाजीतही दिलंय प्रमोशन, अर्शदीप पुन्हा बळीचा बकरा...

SCROLL FOR NEXT