सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर माहेरवाशीण असलेल्या गौराई मातेच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांसह गौराईमातेच्या भक्तांना लागतात. ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात रविवारी (ता. ३१) हजारो गौराईमातेचे मोठ्या धुमधडाक्यात आगमन होऊन त्या दोन दिवस मुक्कामी येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक सहा हजार ५०२ गौरीमातांचे या कल्याण-डोंबिवली या शहरी भागात आगमन होणार आहे.
गणेश चतुर्थीला ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात एक लाख ५७ हजार ८४२ लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. त्यानंतर दीड दिवसांच्या गणरायांना साश्रूनयनांनी निरोप दिला. तसेच या रविवारी माहेरवाशीण गौरीमातेच्या आगमनासाठी सारेच जण सज्ज झाले आहेत. त्यातच ठाणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १५ हजार ३२७ गौराईंचे आगमन धुमधडाक्यात आगमन होणार आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याण परिमंडळात सहा हजार ५०२, त्या खालोखाल उल्हासनगरमध्ये चार हजार ४८५, ठाणे शहरामध्ये एक हजार ७८२, वागळे इस्टेट परिसरात एक हजार ६७० आणि भिवंडीत ८८८ गौराईंचा समावेश आहे. या आगमनानंतर गौराईचे सोमवारी (ता. १) पूजन होणार असून मंगळवारी (ता. २) त्या परतीच्या प्रवासाला म्हणजे विधिवत विसर्जन होणार आहे.
ज्येष्ठा गौरीपूजन
यावर्षी रविवारी सायंकाळी ५.२५ वाजेपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरी आणाव्यात. सोमवारी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे आणि मंगळवारी रात्री ९.५० वाजेपर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.