मुंबई

पार्किंग वादातून टोळक्याकडून पोलिसाला मारहाण

CD

भिवंडी, ता. ३० (वार्ताहर) : जोरदार पाऊस आल्याने कल्याण बायपास रस्त्यावरील एका शेडखाली उभे असताना पार्किंगवरून वाद झाल्याने एका टोळक्याने पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे; मात्र सामान्यांच्या सुरक्षेची हमी घेणाऱ्या पोलिसांवरच हल्ला झाल्याने सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे दिसत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोनगाव पोलिस ठाण्यात कर्तव्यावरून बुधवारी (ता. २७) मध्यरात्रीच्या सुमारास कर्मचारी सुनील पाटील हे घरी जात होते. पाऊस आल्याने ते कल्याण बायपासवरील एका दुकानाच्या शेडखाली उभे राहिले. त्या वेळी त्यांच्या मागून आलेल्या मोटारसायकलस्वाराने (एमएच ०५ सीएक्स ७५५२) पाटील यांच्याबरोबर पार्किंगवरून वाद घातला; मात्र त्यांनी समजूतदारपणा दाखवत माफी मागितली; पण दुचाकीचालकाने आपणसुद्धा घोडबंदर रोडला ट्रॅफिक पोलिस आहे, असे धमकावत तीन साथीदारांना बोलावले. हा पोलिस असून त्याला मारहाण करण्याचे खुणावले. त्यानंतर चौघांनी पाटील यांना शिवीगाळ करून दोघांनी पकडून त्यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून घेत हाताच्या ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जमिनीवर पाडून लाथांनी, तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्या वेळी तेथील एका रिक्षाची काच संशयितांनी पोलिसाच्या तोंडावर मारली. पोलिसाने मदतीसाठी याचना केली असता लोकांच्या दिशेने चाकू फिरवत धमकावल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हत्ती-ड्रॅगन एकत्र येणं गरजेचं, सीमावादाचा परिणाम सबंधांवर होऊ नये; PM मोदी-जिनपिंग चर्चेत काय झालं? चीनने दिली माहिती

Viral Video: वाईड बॉलवर आधी स्वीच हिट अन् मग हिट विकेट; T20 मॅचमध्ये फलंदाज विचित्रपद्धतीने बाद

Manoj Jarange: राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलं पोरगं, कुचक्या कानाचं; मनोज जरांगेंची खोच टीका

Latest Marathi News Live Updates : नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

Lover Killed Girl : सोशल मीडियावर महिन्याची ओळख, प्रियकराला भेटल्यानंतर तीचा खून केला अन् आंबा घाटात फेकला मृतदेह पण एक चूक...

SCROLL FOR NEXT