मुंबई

मुरूड आगारात सीएनजी गॅस पंपची मागणी

CD

मुरूड आगारात सीएनजी गॅस पंपाची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्‍न; लवकरच बैठक होण्याची शक्‍यता
मुरूड, ता. ३० (वार्ताहर) ः मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप सुरू करण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांनी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आले असून, खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने ४ सप्टेंबर रोजी या विषयावर विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन उपस्थित राहणार आहे. मुरूड आगारात सीएनजी गॅस पंप तातडीने कार्यान्वित करण्याबाबत ठोस निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने दिली.
मुरूड हे कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, ऐतिहासिक जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग, निसर्गसौंदर्य आणि खाद्य संस्कृती यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. मात्र सीएनजी पंपाच्या अभावामुळे एसटी बस गाड्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या मुरूड आगारातील नव्याने आलेल्या पाच गाड्यांसह इतर ३० ते ३५ बस सीएनजीवर धावत असल्या तरी गॅस भरण्यासाठी अलिबागला जावे लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच, शिवाय प्रवाशांचा खोळंबा होतो. गणेशोत्सवासारख्या गर्दीच्या काळात ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करते.
एसटी महामंडळाने पर्यावरणपूरक सीएनजी बसेस सुरू केल्या असल्या तरी फक्त काही आगारांतच पंप कार्यान्वित आहेत. परिणामी गॅस भरण्यासाठी गाड्या रांगेत तासन्‌तास उभ्या राहतात. या विलंबामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आणि चालक-वाहकांवर तणाव वाढतो. त्यामुळे प्रवास सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
....................
या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देऊन मुरूड आगारात सीएनजी गॅस पंप सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार तटकरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, आता यश मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना दांडेकर म्हणाले, की सीएनजी पंप सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल. रायगड जिल्हा सोशल मीडिया सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हसमुख जैन यांनी सांगितले, की लवकरच हा गॅस पंप सुरू होईल आणि प्रवासीवर्गाला मोठा दिलासा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shevgaon politics: 'शेवगावातील मातब्बरांचा भाजपत प्रवेश'; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडी, राजळेंसोबत जाण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार

CM Yogi Adityanath: सीएम योगींनी आदिवासी समाजाला दिली दिवाळी भेट, या घरी दिप प्रज्वलन करून साजरा केला सण

Solapur News: 'धोत्री येथे आढळला साडेसात फुटी अजगर'; नाग फाउंडेशनच्या रेस्क्यू पथकाने पकडून अधिवासात केले मुक्त

Cyclone Alert India : पुढील तीन दिवस देशभरात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' राज्यांत चक्रीवादळ तांडव माजवणार, IMD कडून सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT