मुंबई

केशवजी नाईक चाळीत १३३ गणेशोत्‍सवाची १३३ वर्षांची परंपरा

CD

केशवजी नाईक चाळीत गणेशोत्‍सवाची १३३ वर्षांची परंपरा
मुंबईतील पहिला गणेशोत्सव; एकाच आकाराची दोन फुटांची गणेशमूर्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. मुंबईतील गिरगावात १८९३ मध्ये केशवजी नाईक चाळीत पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. इथे अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेली १३३ वर्षे एकाच आकाराची दोन फुटांची गणेशमूर्ती इथे विराजमान होते. या गणपतीचा आगमन आणि विसर्जन सोहळा आजही पालखीतून पार पाडला जातो. चाळीतील लहानथोर सारेजण पारंपरिक वाद्यांच्या साथीने या सोहळा केला जातो.
सुरुवातीच्या काळात चाळीसमोरील रस्त्यावर मंडपात बाप्पाची स्थापना केली जायची; पण पुढे रहदारी वाढू लागल्याने चाळीच्या मधल्या मोकळ्या जागेत गणराया विराजमान होऊ लागले. तेव्हापासून आजतागायत ती जागा बदललेली नाही. १९०१ मध्ये मुंबईत एका सार्वजनिक सभेसाठी आलेल्या टिळकांनी अनेक गणपती मंडळांना भेट दिली होती. या दौऱ्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केशवजी नाईक चाळीपासून केली होती. ‘मुंबईचा गणपती उत्सव’ या मथळ्याखाली केसरीमध्ये त्यांनी एक लेखही प्रकाशित केला होता. गणेशोत्सवातील व्याख्यानमालेची सुरुवातही लोकमान्य टिळकांनीच केली होती. दरम्यान, लोकमान्यांचे विचार ऐकण्यासाठी त्या वेळी हजारो लोक चाळीच्या परिसरात जमले होते, याची इतिहासात नोंद आहे. या सोहळ्याचा शतकपूर्वी सोहळा २००१ मधील गणेशोत्सवादरम्यान मोठ्या दिमाखात पार पडला होता. ज्यात लोकमान्य टिळकांची प्रतीकात्मक मिरवणूकही काढण्यात आली होती.
केशवजी नाईक यांनी १८६०-६२च्या दरम्यान गिरगावात सात चाळींची एक वसाहत तयार केली. याच वसाहतीला पुढे केशवजी नाईक चाळी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. गिरगावच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या या चाळीत मराठी कुटुंबे स्थायिक झाली. यामध्ये केशवसुत, कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, समाजवादी नेते एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, वीर वामनराव जोशी यांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या काळात इथे स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांची व्याख्याने झाली आहेत. याशिवाय, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच भाजप अध्यक्षपदी असताना अमित शहा, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर असा दिग्गज व्यक्तींनी इथल्या गणपतीचे दर्शन घेतले आहे.

मूर्तिकारांची पाचवी पिढी
नियोजित ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना साध्या व मंगलमय वातावरणात केली जाते. सुरुवातीपासूनच गणेशमूर्ती एका पिढीजाद मूर्तिकाराकडून बनविली जाते. या मूर्तिकारांचीही आज किमान पाचवी पिढी या मूर्तिकामामध्ये त्याच उत्साहाने कार्यरत असते, मध्यम आकाराची ही मूर्ती गेल्या कित्येक वर्षांपासून ठरलेल्या अशा अतिशय सुंदर व नेत्रसुखद ध्यानामध्ये साकार होते. गणेशमूर्तीचे उत्सवस्थानी आगमन पालखीतून केले जाते.

पारर्दशकता राखण्यासाठी...
सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ व जाणकार सभासदांच्या मार्गदर्शनानुसार उत्सवाचे आयोजन होत असे; परंतु उत्सवाची व्याप्ती वाढू लागल्यावर शिस्त व नियमबद्ध व्यवस्थापन ओघानेच आले. संस्थेचा जमा-खर्च, कार्यक्रमांचे आयोजन अशा गोष्टींच्या महत्त्वाची व संबंधित जबाबदाऱ्यांची जाणीवही कार्यकर्त्यांना होते. म्हणूनच या सर्व बाबींमध्ये सुसूत्रता आणून पारदर्शकता राखणे सुलभ व्हावे, यासाठी एका रीतसर घटनेची गरज निर्माण झाली. सन १९३५ साली एक तत्कालीन रहिवासी व पेशाने शिक्षक असलेले त्र्यंबक पुरुषोत्तम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची घटना तयार करण्यात आली व त्याची अंमलबजावणी लगेचच सुरू झाली. घटनेनुसार उत्सव साजरा करणारी मुंबईतील पहिलीच संस्था असावी, असे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील पहिला गणपती उत्सव १८९३ साली केशवजी चाळीत सुरू करण्यात आला होता. आज १३३वे वर्ष आहे; परंतु साधी सजावट, समान मूर्ती, ध्वनिक्षेपक नाही. लहान मुलांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या स्पर्धा, महिलांसाठी हळदी-कुंकू यासह चाळीतील मुलांचा ऑर्केस्ट्रा केला जात आहे. तसेच, इतरही सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
- विजय दातार, विश्वस्त, मुंबईतील पहिला गणेशोत्सव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : आझाद मैदानावरील घाणीवरून सकल मराठा महासंघाचा इशारा; कचरा मंत्रालयात टाकू, दूध-भाजीपाला पुरवठा बंद करू!

Aajoba Ganpati: भारतातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘आजोबा गणपती’, वाचा इतिहास, परंपरा आणि गौरव

एकेकाळी अंकिता लोखंडेलाही प्रियाने दिलेली टक्कर; पवित्र रिश्तामधील गाजलेली भूमिका ते दमदार खलनायिका

MLA Dheeraj Lingade: शेगाव येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे: आमदार धीरज लिंगाडे; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विभाजनाची मागणी

Kolhapur Sound System : ‘काचा फोडण्याची’ भाषा करणारा पळाला, पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षाला बोलवून दिला प्रसाद; साउंड सिस्टीमविरोधात पोलिस आक्रमक

SCROLL FOR NEXT