ठाण्याचा राजा घडवतोय ११ जागृत मारुतींचे दर्शन
पाचपाखाडीत साकारला पुरातन मंदिराचा देखावा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या पाचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील ११ जागृत मारुतीरायांचे दर्शन घडविले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून ११ मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली आहे.
१९७९मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. यंदा या मंडळाने राज्यातील ११ जागृत मारुती मंदिरांचा देखावा उभारला आहे. अष्टविनायकाच्या धर्तीवर ११ मारुतींचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. त्याच अनुषंगाने १७व्या शतकात प्रतिष्ठापित केलेले सातारा येथील चुन्याचा मारुती, मसूर-सातारा येथील मसूर मारुती, चाफळ-सातारा येथील दास मारुती; वीर मारुती, शिंगणवाडी-सातारा येथील खडीचा मारुती, उंब्रज-सातारा येथील मठातील मारुती, माजगाव येथील माजगावचा मारुती, बहे-सांगली येथील बहेचा मारुती, मनपाडळे-कोल्हापूर येथील मनपाडळेचा मारुती, पारगाव-कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे-सांगली येथील वीर मारुती या अकरा मारुतींच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे. या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे.
नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक भंगरथ यांच्यासह सदस्य परिश्रम घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.